Naxalite Leader Arrested: माओवाद्यांचा गड उद्ध्वस्त; 40 वर्षांचा पाठलाग संपला; 2.20 कोटींचं बक्षीस असणारा मोठा मास्टरमाइंड गजाआड

मंगळवारी दिवसाच्या सुरुवातीला सारंडा परिसरात 24 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करल्यानंतर, रात्रीच्या वेळी हा सर्वात मोठा माओवादी चेहरा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.<br/>

Naxalite Leader Arrested: माओवाद्यांचा गड उद्ध्वस्त; 40 वर्षांचा पाठलाग संपला; 2.20 कोटींचं बक्षीस असणारा मोठा मास्टरमाइंड गजाआड

Naxalite Leader Arrested:  चार दशकांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आणि माओवादी चळवळीचा प्रमुख आधारस्तंभ मानला जाणारा जहाल नक्षलवादी मिसिर बेसरा याला सुरक्षा दलांनी बेड्या ठोकल्या आहेत. गिरिडीह-धनबाद सीमेवरील मनियाडीह भागात पार पडलेल्या या धडक कारवाईत बेसरासह त्याचे दोन निकटवर्तीय – मेहनत उर्फ मोचू आणि गौरव – यांनाही एका टाटा मॅजिक वाहनातून जाताना ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी दिवसाच्या सुरुवातीला सारंडा परिसरात 24 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करल्यानंतर, रात्रीच्या वेळी हा सर्वात मोठा माओवादी चेहरा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

'आयबी'चे गुप्त इनपुट आणि पोलिसांचे अचूक नियोजन
केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला (IB) मिसिर बेसराच्या हालचालींची अत्यंत अचूक माहिती मिळाली होती. तो आपल्या साथीदारांसह गिरिडीहच्या दिशेने प्रवास करत असल्याचे समजताच राज्य पोलीस मुख्यालय, सीआरपीएफ आणि झारखंड जग्वार्स यांनी मिळून एक विशेष रणनीती आखली. या तिन्ही दलांच्या अत्यंत गोपनीय आणि समन्वित मोहिमेमुळे दीर्घकाळ चकवा देणाऱ्या बेसराला पकडणे शक्य झाले. मूळचा पिरतांड येथील रहिवासी असलेला बेसरा धनबादमध्ये कॉलेज शिक्षण घेत असताना सावकारविरोधी आंदोलनाच्या माध्यमातून नक्षलवादी चळवळीकडे आकर्षित झाला होता.

माओवादी संघटनेला मोठा धक्का: 'पॉलिटब्युरो'चे अस्तित्व धोक्यात
सीपीआय (माओवादी) च्या सर्वोच्च 'पॉलिटब्युरो' समितीमध्ये उरलेला मिसिर बेसरा हा एकमेव सक्रिय सदस्य होता. यापूर्वी 22 फेब्रूवारी 2026 रोजी संघटनेचा प्रमुख देव याने शरणागती पत्करली होती, तर 21 मे 2025 रोजी नंबला केशव राजू उर्फ बसव राजू सुरक्षा दलांच्या चकमकीत ठार झाला होता. पूर्व सचिव गणपती गेल्या 8 वर्षांपासून बेपत्ता असून आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. त्यातच बेसराच्या अटकेमुळे माओवादी संघटनेचे कंबरडे पार मोडले आहे.

शरणागतीचे सत्र अन्‌ पोलिसांची मिळवलेली पकड
गेल्या काही महिन्यांत शरण आलेल्या नक्षलवाद्यांकडून पोलिसांना बेसराच्या ठावठिकाण्याबद्दल महत्त्वपूर्ण धागेदोर मिळाले होते. मे महिन्यात त्याच्या पथकातील 27 सहकाऱ्यांनी आत्मसमर्पण केले होते, तर मंगळवारी आणखी 24 जण शरण आल्याने पोलिसांचा त्याच्यावरील फास अधिक आवळला गेला. यापूर्वी सप्टेंबर 2007 मध्ये त्याला खुंटी येथून अटक झाली होती; परंतु 2009 मध्ये लखीसराय न्यायालयावरील नक्षलवादी हल्ल्याचा फायदा घेऊन तो पळून गेला होता. त्यानंतर त्याने बुढा पहार, कोल्हान आणि सारंडाच्या जंगलांतून आपल्या हालचाली सुरू ठेवल्या होत्या.

हेही वाचा – FDA चा दणका! मुंबईतील 5 नामांकित क्लबचे अन्न परवाने निलंबित; आतापर्यंत FDA ची 12 आस्थापनांना सुधारणा नोटीस

4 राज्यांत 150 हून अधिक गुन्हे आणि 2.20 कोटींचे बक्षीस
झारखंड, बिहार, ओडिशा आणि छत्तीसगड या 4 राज्यांमध्ये बेसराविरुद्ध 150 पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. एनआयए (NIA) देखील 2 प्रकरणांत त्याचा शोध घेत होती. त्याच्यावर झारखंड सरकारने 1 कोटी रुपये आणि ओडिशा सरकारने 1.20 कोटी रुपये असे एकूण 2.20 कोटी रुपयांचे इनाम ठेवले होते. अटकेनंतर पोलिसांनी बेसरा आणि त्याच्या सहकाऱ्यांना तातडीने रांचीकडे रवाना केले असून, पोलिसांची पुढील चौकशी सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number