ISIS Commander Death: अमेरिकेची मोठी कारवाई; ISIS चा टॉप कमांडर अबू-बिलाल अल-मिनुकीला संपवलं, कसा रचला सापळा?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत या यशस्वी ऑपरेशनची माहिती दिली.

ISIS Commander Death: अमेरिकेची मोठी कारवाई; ISIS चा टॉप कमांडर अबू-बिलाल अल-मिनुकीला संपवलं, कसा रचला सापळा?

ISIS Commander Death: जागतिक दहशतवादाविरुद्ध अमेरिकेने एक मोठी मोहीम फत्ते केली असून, इसिसचा (ISIS) प्रभावशाली कमांडर अबू-बिलाल अल-मिनुकी याला कंठस्नान घातले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत या यशस्वी ऑपरेशनची माहिती दिली. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या थेट आदेशानंतर अमेरिकन सैन्य आणि नायजेरियाच्या लष्कराने एका अत्यंत कठीण आणि संयुक्त मोहिमेद्वारे या दहशतवाद्याला संपवलं.  

इसिसचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठ्या नेत्याचा मृत्यू  
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू-बिलाल अल-मिनुकी हा इसिसच्या जागतिक फळीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कमांडर होता. तो आफ्रिकेतील विविध गुप्त ठिकाणांहून दहशतवादी कारवायांचे जाळे विणत होता. अमेरिकन गुप्तचर संस्था त्याच्या हालचालींवर गेल्या अनेक दिवसांपासून बारीक लक्ष ठेवून होत्या. योग्य वेळ साधून अमेरिकन विशेष दलाने नायजेरियाच्या सैन्यासोबत मिळून ही कारवाई यशस्वी केली, ज्यामुळे इसिसच्या नेतृत्वाला मोठा हादरा बसला आहे.

जागतिक दहशतवादी जाळ्याला मोठा धक्का
अल-मिनुकी हा केवळ आफ्रिकेतच नव्हे, तर जागतिक स्तरावर अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करण्याच्या कटात सामील होता. त्याच्या मृत्यूमुळे इसिसच्या नेटवर्कला आणि त्यांच्या ऑपरेशनल क्षमतेला मोठा तडा गेला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या कारवाईत सहकार्य केल्याबद्दल नायजेरिया सरकारचे आभार मानले आहेत. हा विजय दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात मैलाचा दगड असल्याचे मानले जात असून, यामुळे इसिसच्या वाढत्या प्रभावाला चाप बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – India-Nepal Relation: मोठी बातमी! अखेर भारताने नेपाळला कोंडीत पकडलं, 'या' महत्त्वाच्या पदार्थाच्या निर्यातीवर घातली बंदी

नायजेरियासोबत संयुक्त मोहीम आणि वाढता धोका
गेल्या काही वर्षांत आफ्रिकेतील अनेक भागांत इसिस आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांचा प्रभाव लक्षणीयरीत्या वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन अमेरिका आणि आफ्रिकन देशांनी दहशतवादविरोधी सहकार्य अधिक मजबूत केले आहे. अल-मिनुकीला मारण्यासाठी अमेरिकन इंटेलिजन्स एजन्सी आणि स्पेशल फोर्सेसने दीर्घकाळ नियोजन केले होते. या कारवाईमुळे आफ्रिकेत सक्रिय असलेल्या इतर दहशतवादी गटांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अमेरिकेने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक धोरणाने दहशतवादाला इशारा दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number