Axis Bank: ॲक्सिस बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; KYC साठी कागदपत्रांची कटकट संपली, काय आहे नवा नियम?

'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) वर आधारित या नवीन उपायांमुळे आता ग्राहकांना किचकट बँकिंग प्रक्रियेतून कायमची सुटका मिळणार आहे.<br/>

Axis Bank: ॲक्सिस बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; KYC साठी कागदपत्रांची कटकट संपली, काय आहे नवा नियम?

Axis Bank: बँकिंग क्षेत्रातील दिग्गज ॲक्सिस बँकेने आपल्या चालू खातेधारकांसाठी (Current Account Holders) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक मोठी सुविधा जाहीर केली आहे. 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) वर आधारित या नवीन उपायांमुळे आता ग्राहकांना किचकट बँकिंग प्रक्रियेतून कायमची सुटका मिळणार आहे.

बँकेत न जाता 'री-केवायसी' पूर्ण होणार
बँकेने दोन महत्त्वाच्या सेवांचे डिजिटायझेशन केले आहे. पहिले म्हणजे एआय-आधारित री-केवायसी आणि दुसरे डिजिटल बिझनेस प्रोफाइल अपडेट. या दोन्ही सेवांसाठी ग्राहकांना आता बँकेच्या शाखेत जाण्याची किंवा प्रत्यक्ष कागदपत्रे जमा करण्याची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे, 'लार्ज लँग्वेज मॉडेल' (LLM) आणि जीएसटी डेटाचा अशा प्रकारे वापर करणारी ही पहिलीच मोठी बँकिंग प्रणाली ठरली आहे.

काय आहेत या नवीन सुविधा?

स्मार्ट बिझनेस प्रोफाइल अपडेट: 'जनरेटिव्ह एआय' आणि रिअल-टाइम जीएसटी डेटाचा वापर करून ही यंत्रणा 3000 हून अधिक पर्यायांमधून तुमच्या व्यवसायाचा योग्य कोड आपोआप निवडते. यामुळे मॅन्युअल डेटा एंट्रीची कटकट संपली असून चुकांची शक्यताही कमी झाली आहे.

इंटेलिजेंट री-केवायसी सोल्यूशन: पूर्वी मॅन्युअल पद्धतीने होणारी ही प्रक्रिया आता एआय हाताळणार आहे. जर तुम्ही एकाच पीडीएफमध्ये अनेक केवायसी कागदपत्रे अपलोड केली, तर ही यंत्रणा आपोआप ती माहिती ओळखून प्रमाणित करेल. कागदपत्र अपूर्ण असल्यास ग्राहकाला त्वरित सूचना मिळेल, ज्यामुळे पडताळणीचा वेळ वाचणार आहे.

हेही वाचा – EPFO Major Rule Change: 12 वर्षांनी EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर मिळणार बक्कळ पेन्शन, पण सध्या खिशाला लागणार कात्री?

ग्राहक आणि बँक दोघांनाही फायदा
ॲक्सिस बँकेच्या मते, या नवीन प्रणालीमुळे 'री-वर्क' म्हणजेच पुन्हा पुन्हा करावी लागणारी कामे कमी झाली आहेत. पहिल्याच प्रयत्नात अचूक डेटा गोळा होत असल्याने बँकेच्या ऑपरेशनल टीमवरील ताण कमी झाला असून कामाचा वेग प्रचंड वाढला आहे. थोडक्यात ॲक्सिस बँकेच्या या निर्णयामुळे व्यापारी आणि व्यावसायिक वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून, तासनतास बँकेत खर्ची घालणारा वेळ आता वाचणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number