Crime News: ‘ताईच्या घरी नेतो’ सांगून निर्जन ठिकाणी नेलं अन्…; 16 वर्षीय मुलीवर स्नॅपचॅटवरील मित्राचा अत्याचार

आरोपीने पीडितेचे आक्षेपार्ह चित्रीकरण करून ते इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी देत तिला पैशांसाठी ब्लॅकमेलही केले.

Crime News: ‘ताईच्या घरी नेतो’ सांगून निर्जन ठिकाणी नेलं अन्…; 16 वर्षीय मुलीवर स्नॅपचॅटवरील मित्राचा अत्याचार

Crime News: पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका 16 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने पीडितेचे आक्षेपार्ह चित्रीकरण करून ते इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी देत तिला पैशांसाठी ब्लॅकमेलही केले. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने हालचाली करत सोमवारी संबंधित संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हे दोन्ही अल्पवयीन एकाच खाजगी शिकवणी वर्गात शिक्षण घेत होते.

स्नॅपचॅटवरील फ्रेंड रिक्वेस्टने वाढवली जवळीक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता 11 वीमध्ये शिकते. तिच्याच अकॅडमीत शिकणाऱ्या या मुलाने गेल्या वर्षी 23 ऑक्टोबर रोजी तिला 'स्नॅपचॅट' या सोशल मीडिया ॲपवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर दोघांमध्ये नियमित संभाषण सुरू झाले. आरोपीने हळूहळू मुलीचा विश्वास संपादन केला आणि तिच्याशी जवळीक साधली. या मैत्रीचा फायदा घेत तो तिच्याकडे वारंवार पैशांची मागणी देखील करू लागला होता.

नातेवाईकांच्या घराचे निमित्त करून अत्याचार आणि चित्रीकरण
गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी आरोपीने पीडितेला आपल्या दुचाकीवर बसवले. "तुला माझ्या ताईच्या घरी घेऊन जातो," असे खोटे सांगून तो तिला एका अनोळखी ठिकाणी घेऊन गेला. तेथे त्याने पीडितेच्या विरोधाला न जुमानता तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. एवढ्या क्रूर कृत्यावरच न थांबता, आरोपीने पीडितेचे आक्षेपार्ह व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने प्रचंड घाबरलेली पीडिता अनेक दिवस शांत राहिली. या भीतीचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्याकडे सातत्याने पैशांचा तगादा लावला होता.

हेही वाचा – RE-NEET पेपर लीकच्या नावाखाली मोठी फसवणूक; अहमदाबाद क्राईम ब्रांचने राजस्थानमधून दोन सायबर ठगांना ठोकल्या बेड्या

आईच्या सतर्कतेमुळे नराधम पोलिसांच्या जाळ्यात; पोक्सोअंतर्गत कारवाई
दरम्यान, आरोपीचा मानसिक त्रास आणि पैशांची मागणी असह्य झाल्याने अखेर पीडित मुलीचा संयम सुटला आणि तिने हा सर्व धक्कादायक प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलीवर बेतलेला प्रसंग ऐकताच आईने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित आरोपी मुला विरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणाऱ्या 'पोक्सो' (POCSO) कायद्यासह इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number