Kapil Sharma Threat Case : कपिल शर्माच्या व्यवस्थापकाला एक कोटी रुपयांच्या खंडणीचा फोन; आरोपी अटकेत

खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने स्वतःला बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा केला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच, मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. <br/>

Kapil Sharma Threat Case : कपिल शर्माच्या व्यवस्थापकाला एक कोटी रुपयांच्या खंडणीचा फोन; आरोपी अटकेत

Kapil Sharma Threat Case: कॉमेडियन कपिल शर्माच्या व्यवस्थापकाला चार दिवसांपूर्वी एका व्यक्तीने फोन करून 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच पैसे न दिल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने स्वतःला बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा केला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच, मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. 

तपासानंतर गुन्हे शाखेने आरोपी दिलीप चौधरी याला पश्चिम बंगालमधील उत्तर परगणा येथून अटक केली आणि मुंबईला आणले. न्यायालयाने आरोपीला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांचा तपास पुढे सुरू असून, खंडणी मागण्यामागील हेतू शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. तथापि, आतापर्यंत तपासात दिलीप चौधरी आणि बिश्नोई टोळी यांच्यात थेट संबंध आढळून आलेले नाहीत.

हेही वाचा – Sonu Sood : अभिनेता सोनू सूदच्या अडचणीत वाढ; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

दरम्यान, हा प्रकार कॅनडामधील कपिल शर्माच्या कॅफेवर झालेल्या गोळीबारानंतर समोर आला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला, सरे येथील कप्स कॅफेवर पहिला हल्ला 10 जुलै रोजी तर 7 ऑगस्ट रोजी दुसरा हल्ला झाला होता. या घटनांनंतर मुंबई पोलिसांनी कपिलच्या सुरक्षेत वाढ केली होती. 

हेही वाचा – Sameer Wankhede : समीर वानखेडेंना दिल्ली हायकोर्टात मोठा धक्का! आर्यन खानच्या वेब सीरिजविरोधात मानहानी प्रकरणाची सुनावणी.. कोर्ट म्हणाले,

कपिल शर्मा ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’, ‘द कपिल शर्मा शो’, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या हिट कॉमेडी शोजमुळे प्रसिद्ध आहे. त्याने 2015 मध्ये ‘किस किसको प्यार करूं’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तथापी, आगामी प्रोजेक्टमध्ये तो ‘किस किसको प्यार करूं 2’ मध्ये दिसणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number