Crime News : ‘4 गर्लफ्रेंड, दारूचं व्यसन..’ होणाऱ्या पतीचं खरं रूप साखरपुड्यानंतर समजलं; तरुणीनं 12 पानांची नोट लिहिली अन्….

बुधवारी कडप्पा येथील पटेल स्ट्रीटवरील राहत्या घरात रेहाना मृतावस्थेत आढळली. तिच्या होणाऱ्या पतीने तिला जाणीपूर्वक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.

Crime News : ‘4 गर्लफ्रेंड, दारूचं व्यसन..’ होणाऱ्या पतीचं खरं रूप साखरपुड्यानंतर समजलं; तरुणीनं 12 पानांची नोट लिहिली अन्….

Kadappa Rehana Suicide Case : नुकत्याच झालेल्या साखरपुड्यानंतर रेहाना नावाच्या 26 वर्षीय तरुणीने स्वतःचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिचा साखरपुडा 15 फेब्रुवारी रोजी बेंगळुरूमध्ये कार्यरत असलेल्या शहाजहानसोबत पार पडला होता. ऑगस्ट महिन्यात त्यांचे लग्न होणार होते, मात्र लग्नाच्या काही महिने आधीच तिच्या होणाऱ्या पतीच्या वागण्यात मोठा बदल झाला. सुरुवातीला तासनतास बोलणाऱ्या शहाजहानने अचानक रेहानाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि लग्नासाठी नकार देऊ लागला, ज्यामुळे रेहाना प्रचंड मानसिक तणावाखाली होती. यानंतर हळूहळू तिला त्याचे खरे रूप समजले.

12 पानांच्या चिठ्ठीने सगळं प्रकरण उलगडलं
रेहानाने आत्महत्येपूर्वी एक 12 पानांची सविस्तर सुसाइड नोट लिहिली आहे, ज्यामध्ये शहाजहानच्या काळ्या कृत्यांचा पाढा वाचला आहे. या पत्रातून समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. शहाजहानचे आधीच 4 इतर मुलींसोबत प्रेमसंबंध होते. त्याला दारूचे व्यसन होते आणि त्याने केवळ वडिलांच्या दबावामुळे लग्नाला होकार दिला होता. त्याने रेहानाला स्पष्टपणे सांगितले होते की, त्याला तिच्याबद्दल कोणतेही प्रेम किंवा ओढ वाटत नाही. शहाजहान सतत लग्न मोडण्यासाठी रेहानावर मानसिक दबाव टाकत होता. अखेर मानसिक ताण असह्य होऊन रेहानाने टोकाचा निर्णय घेतला. आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 

हेही वाचा – Amravati News: अमरावतीत आई-वडिलांचा प्रताप, स्वत:च्याच 16 वर्षीय लेकीचं केलं मुंडण आणि..; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

कुटुंबाचा आरोप आणि पोलिसांची कारवाई
बुधवारी कडप्पा येथील पटेल स्ट्रीटवरील राहत्या घरात रेहाना मृतावस्थेत आढळली. एमएससी (MSc) पर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या रेहानाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहाजहानने तिला जाणीवपूर्वक मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत शहाजहान आणि त्याच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारण, या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात केवळ होणारा पतीच नाही, तर त्याच्या पालकांचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

न्यायालयीन कोठडी आणि तपास
पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एका होतकरू तरुणीला लग्नापूर्वीच अशा प्रकारे मृत्यूला सामोरे जावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस आता या 12 पानांच्या सुसाइड नोटमधील इतर पुराव्यांची सखोल चौकशी करत आहेत.

हेही वाचा – Pune Firing Case: पुणे हादरलं! भरदिवसा सलूनमध्ये गोळीबार, दोन जण जखमी; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number