Crime News: अवघ्या 41 दिवसांत न्याय… 18 महिन्यांच्या पुतण्याला जमिनीवर आपटून मारणाऱ्या नराधम काकाला फाशीची शिक्षा

आपल्या 18 महिन्यांच्या चिमुकल्या पुतण्याला, आरवला, रस्त्यावर निर्घृणपणे 8 वेळा जमिनीवर आपटून संपवणाऱ्या नराधम काकाला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Crime News: अवघ्या 41 दिवसांत न्याय… 18 महिन्यांच्या पुतण्याला जमिनीवर आपटून मारणाऱ्या नराधम काकाला फाशीची शिक्षा

Crime News: उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद न्यायालयाने एका अत्यंत क्रूर आणि मन सुन्न करणाऱ्या हत्याकांडात अवघ्या 41 दिवसांत आपला ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. आपल्या 18 महिन्यांच्या चिमुकल्या पुतण्याला, आरवला, रस्त्यावर निर्घृणपणे 8 वेळा जमिनीवर आपटून संपवणाऱ्या नराधम काकाला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही हृदयद्रावक घटना 30 मे रोजी शिकोहाबाद येथील यादव कॉलनीत घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त होत होता. पीडित मुलाच्या आईने आरोपीला मरेपर्यंत फाशी देण्याची मागणी केली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत फास्ट-ट्रॅक न्यायालयात खटला चालवला आणि आरोपीला कठोर शिक्षा मिळवून दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरसागंज तहसीलच्या बामाई गावातील रहिवासी असलेल्या रती यांचा सुमित याच्याशी विवाह झाला होता, मात्र कौटुंबिक वादामुळे त्यांचा घटस्फोटाचा खटला सुरू होता. यादरम्यान, नातेवाईक (पतीचा धाकटा भाऊ) असलेल्या विराज पाठक (जितेंद्र पाठक) याने रती यांच्यावर एकतर्फी प्रेमातून लग्नासाठी दबाव टाकला होता. मात्र, रती यांनी या लग्नाला नकार दिला, कारण त्यांना 18 महिन्यांचा मुलगा होता. 

विराजला हा चिमुकला आरव आपल्या मार्गातील अडथळा वाटत होता. यामुळे त्याने एक भयानक कट रचला आणि 30 मे रोजी आरवला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने सोबत नेले. त्यानंतर त्याने अत्यंत निर्दयीपणे आरवला जमिनीवर आपटले. कुटुंबीयांनी मुलाला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा – ATS Raid: महाराष्ट्रात ATS मोठी रेड! एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडसत्र; पाकिस्तानी गँगस्टरच्या कनेक्शनने खळबळ

या क्रूर कृत्यानंतर आरोपी विराज घटनास्थळावरून पळून गेला होता. मात्र, मैनपुरी रोडवरील बुद्ध भरथरा चौकाजवळ तो लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ 4 सदस्यांचे विशेष पथक तयार करून परिसराला वेढा घातला. स्वतःला वेढलेले पाहून झुडपांत लपलेल्या आरोपीने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या प्रत्युत्तराच्या गोळीबारात आरोपीच्या दोन्ही पायांवर गोळ्या लागल्या आणि तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या ताब्यातून 1 गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे आणि 2 रिकामी काडतुसे जप्त केली. पोलिसांनी गुन्ह्यानंतर अवघ्या 6 दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते, ज्यामुळे या नराधमाला फाशीच्या खांबापर्यंत पोहोचवणे शक्य झाले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number