Expired Food Products : अमूलच्या नावाखाली ‘एक्स्पायर्ड’ मालाचा काळाबाजार! 30,000 किलो माल जप्त; आरोपीला अटक, कुठे आणि कसा घडला गुन्हा?

एका फर्मने चक्क कालबाह्य (Expired) झालेला माल नवीन तारखा टाकून विकण्याचा घाट घातला होता, मात्र अन्न सुरक्षा विभागाने वेळीच छापा टाकून हा कट उधळून लावला.

Expired Food Products : अमूलच्या नावाखाली ‘एक्स्पायर्ड’ मालाचा काळाबाजार! 30,000 किलो माल जप्त; आरोपीला अटक, कुठे आणि कसा घडला गुन्हा?

Expired Food Products : लोकप्रिय डेअरी ब्रँड 'अमूल'च्या नावाखाली ग्राहकांच्या जिवाशी खेळणारा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका फर्मने चक्क कालबाह्य (Expired) झालेला माल नवीन तारखा टाकून विकण्याचा घाट घातला होता, मात्र अन्न सुरक्षा विभागाने वेळीच छापा टाकून हा कट उधळून लावला. यामध्ये नूडल्स, टोमॅटो केचअप, म्योनीज आणि एनर्जी ड्रिंक यांसारख्या पदार्थांचा समावेश होता, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकले असते.

6 कोटींचा 'विषारी' साठा जप्त
राजस्थानची राजधानी जयपूरमधील खो-नागोरियान भागात अन्न सुरक्षा विभागाने बुधवारी, 11 फेब्रुवारी 2026 रोजी ही मोठी कारवाई केली. येथील 'अ‍ॅथलीट डिस्ट्रिब्युटर' (Athlete Distributor) या फर्मच्या गोदामावर छापा टाकला असता, तिथे अमूल ब्रँडचे तब्बल 3,000 कार्टन्स कालबाह्य झालेले आढळले. या जप्त केलेल्या मालाची किंमत बाजारात सुमारे 6 कोटी रुपये इतकी आहे. अन्न सुरक्षा विभागाने जप्त केलेला 30,000 किलो माल तातडीने सील केला असून तो जयपूर महानगरपालिकेच्या डम्पिंग यार्डमध्ये नष्ट करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या फर्मचा फूड लायसन्स (Food License) देखील यापूर्वीच कालबाह्य झाले होते.

हेही वाचा – Nashik Crime : कुंडली दाखवून किराणा दुकानदाराचं भविष्य अंधारात, ज्योतिषाने 73 लाख लुटले

यूट्यूबवरून शिकला तारीख पुसण्याची 'कला'
या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि फर्मचा मालक गगन आहुजा याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सांगितले की:
थिनरचा वापर: कालबाह्य झालेली तारीख पुसण्यासाठी तो थिनर आणि एसीटोन यांसारख्या केमिकलचा वापर करत असे.
यूट्यूबची मदत: मूळ कंपनीने एक्सपायर्ड माल परत घेण्यास नकार दिल्यानंतर, तारखा बदलून माल कसा विकायचा, हे त्याने यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून शिकले होते.
नवा छाप: जुनी तारीख पुसून त्यावर नवीन मॅन्युफॅक्चरिंग डेट प्रिंट करण्याची यंत्रणाही त्याने गोदामात बसवली होती.

अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मनिष मित्तल यांनी सांगितले की, 181 या हेल्पलाईन पोर्टलवर मिळालेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. सध्या गोदामाला टाळे ठोकण्यात आले असून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

ग्राहकांसाठी धोक्याची घंटा
हा माल ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि स्थानिक दुकानांमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची गगन आहुजाची तयारी होती. एक्सपायर्ड म्योनीज किंवा नूडल्स खाल्ल्याने अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होऊन अनेक लोकांचा मृत्यू ओढवू शकला असता. त्यामुळे नामांकित कंपनीचे उत्पादन असले तरी, त्यावर प्रिंट केलेली तारीख आणि पॅकेजिंगमध्ये काही फेरफार आढळल्यास ग्राहकांनी सावध राहणे गरजेचे आहे.

हेही वाचा – Viral Incident: जबरदस्तीचं लग्न, पलंगावर सापाची कात; तरुणीने नागिणीचं रूप धारण केलं? नेमकं घडलं तरी काय…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number