Military Spying : ISI फंडिंग नेटवर्कचा पर्दाफाश; महाराष्ट्रातून पैसे पुरवणाऱ्या एजंटला अटक

पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI च्या देशव्यापी हेरगिरी आणि आर्थिक जाळ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी राजस्थान सीआयडीच्या गुप्तचर विभागाने ही मोठी कारवाई केली.

Military Spying : ISI फंडिंग नेटवर्कचा पर्दाफाश; महाराष्ट्रातून पैसे पुरवणाऱ्या एजंटला अटक

ISI Funding Agent Arrested in Maharashtra : भारतीय लष्कराची अत्यंत गोपनीय माहिती थेट पाकिस्तानपर्यंत पोहोचवणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा राजस्थान पोलिसांनी छडा लावला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI च्या देशव्यापी हेरगिरी आणि आर्थिक जाळ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी राजस्थान सीआयडीच्या गुप्तचर विभागाने ही मोठी कारवाई केली. या हाय-व्होल्टेज कारवाईअंतर्गत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथून रफीक चाँद शेख (वय 41) नावाच्या संशयित फंडिंग एजंटला ताब्यात घेण्यात आले आहे. 30 जून रोजी करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशाच्या संरक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

बँक खात्यांमधून उघड झाले रॅकेट
या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे जानेवारी 2026 मध्ये अधिकृत गोपनीयता कायद्यांतर्गत दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान समोर आले. यापूर्वी पोलिसांनी जैसलमेरमधून झबरा राम आणि आसाममधील डिब्रुगड हवाई दल तळावर कार्यरत असलेला एमटीएस कर्मचारी सुमित कुमार यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती. हे दोघेही पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवत होते. तपास यंत्रणांनी जेव्हा या आरोपींच्या बँक खात्यांमधील व्यवहारांची कसून चौकशी केली, तेव्हा त्यांना हेरगिरीसाठी मिळणारा सर्व पैसा छत्रपती संभाजीनगरच्या रफीक चाँद शेखमार्फत पाठवला जात असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा – PM Awas Yojana Update: या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम घरकुल योजनेचा लाभ, अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

चार वर्षांपासून पाकिस्तानी हँडलरशी संपर्क
धक्कादायक बाब म्हणजे रफीक चाँद शेख हा स्वतः थेट कोणतीही संवेदनशील माहिती गोळा करत नव्हता; तर तो केवळ ISI चा मुख्य आर्थिक रसद पुरवणारा (फंडिंग एजंट) म्हणून कार्यरत होता. गेल्या सुमारे 4 वर्षांपासून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट पाकिस्तानातील एका आयएसआय हँडलरच्या संपर्कात होता. त्या हँडलरच्या सूचनेनुसार रफीकने स्वतःच्या आणि इतर काही लोकांच्या नावावर बनावट बँक खाती उघडली होती. या खात्यांमध्ये आधी विविध मार्गांनी पैसे जमा केले जायचे आणि त्यानंतर तो निधी टप्प्याटप्प्याने लष्कराची माहिती लीक करणाऱ्या देशातील इतर आरोपींपर्यंत पोहोचवला जायचा.

पोलिसांचा देशद्रोहींना कडक इशारा
राजस्थान पोलिसांनी 30 जून रोजी रफीकला बेड्या ठोकल्या असून, या आंतरराष्ट्रीय आर्थिक साखळीत आणखी कोणकोणत्या लोकांचा सहभाग आहे याचा सखोल तपास सुरू केला आहे. हा देशविरोधी कारवायांसाठी लागणारा पैसा नेमका कुठून येत होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. देशाच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या आणि देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी किंवा संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही, असा कडक इशारा तपास यंत्रणांनी दिला आहे.

हेही वाचा – 130th Constitutional Amendment Bill: अटक झाल्यास पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना सोडावे लागणार पद; पावसाळी अधिवेशनात ऐतिहासिक विधेयक येण्याची शक्यता

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number