Constitution Day 2025: ‘भारताची लोकशाही जगासाठी आदर्श…’; संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती मुर्मू यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

आपल्या भाषणादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की भारताची लोकशाही जगासाठी एक उदाहरण आहे. भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

Constitution Day 2025: ‘भारताची लोकशाही जगासाठी आदर्श…’; संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती मुर्मू यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

Constitution Day 2025: देशभरात आज संविधान दिन साजरा होत आहे. तथापी, संविधान दिनानिमित्त  संसद भवनाच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने आपले संविधान स्वीकारल्याच्या स्मृतीदिनानिमित्त हा राष्ट्रीय सोहळा पार पडला. आपल्या भाषणादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की भारताची लोकशाही जगासाठी एक उदाहरण आहे. भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वासही यावेळी मुर्मू यांनी व्यक्त केला.  

हेही वाचा – Vande Bharat Train : ‘वंदे भारत’ प्रकल्पाचे जनक सुधांशू मणी यांनी सांगितला रेल्वे प्रवासाचा अनुभव; म्हणाले, ‘प्रवासी संख्येमुळे….’

भारत जगासाठी लोकशाहीचे प्रेरणास्थान – राष्ट्रपती मुर्मू

यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, बोडो, काश्मिरी, तेलुगू, ओडिया आणि आसामी यासह 9 भाषांमध्ये संविधानाच्या अनुवादित आवृत्त्यांचे प्रकाशन केले. तथापी, यावेळी द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, भारताची लोकशाही आज जगासाठी एक उदाहरण बनली आहे. देश लवकरच जगातील तिसरा सर्वात मोठा आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल. राष्ट्रपती मुर्मू यांनी संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्वक उल्लेख करत, संविधान सभा हेच भारताचे अंतरिम संसद भवन असल्याची ऐतिहासिक आठवणही उपस्थितांना करून दिली.

हेही वाचा – CM Of Karnataka : कर्नाटकात सत्ता स्थापनेवरून तणाव; डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा पुन्हा सुरू

भारत एक आहे आणि एकसंधच राहील – उपराष्ट्रपती राधाकृष्णन

कार्यक्रमात भाषण करताना उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, आपले संविधान हे स्वातंत्र्यलढ्यातील लाखो भारतीयांच्या त्याग, आशा आणि स्वप्नांचे प्रतीक आहे. संविधानावरील त्यांच्या निष्ठेमुळेच भारत आज जगातील सर्वात मोठी लोकशाही बनला आहे. या संविधानाच्या आत्म्याने सिद्ध केले आहे की, भारत एक आहे आणि सदैव एक राहील. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number