Raja Raghuvanshi Case: ‘मी नेपाळला पळून गेलेली नाही, शिलाँगमध्येच…’; राजा रघुवंशी मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी सोनमचा दावा

एका खाजगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सोनमने सांगितले की, ती सध्या इंदूरला जाण्याच्या कोणत्याही विचारात नसून, संपूर्ण न्यायालयीन तपासात कायदेशीररीत्या सहकार्य करत आहे.

Raja Raghuvanshi Case: ‘मी नेपाळला पळून गेलेली नाही, शिलाँगमध्येच…’; राजा रघुवंशी मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी सोनमचा दावा

Raja Raghuvanshi Case: इंदूरमधील बहुचर्चित राजा रघुवंशी मृत्यू प्रकरणाला आता एक नवीन कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मृत राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशी हिने ती नेपाळला पळून गेल्याच्या वृत्ताचे तीव्र शब्दांत खंडन केले आहे. आपल्याविरुद्ध जाणीवपूर्वक चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे सांगत तिने आपण देशातच असल्याचे स्पष्ट केले. एका खाजगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सोनमने सांगितले की, ती सध्या इंदूरला जाण्याच्या कोणत्याही विचारात नसून, संपूर्ण न्यायालयीन तपासात कायदेशीररीत्या सहकार्य करत आहे.

विपिन रघुवंशी यांच्या आरोपांमुळे खळबळ आणि CBI चौकशीची मागणी
सोनम रघुवंशीचे हे स्पष्टीकरण अशा वेळी आले आहे, जेव्हा मृत राजा रघुवंशीचा मोठा भाऊ विपिन रघुवंशी याने तिच्यावर गंभीर आरोप केले होते. सशर्त जामिनाचा गैरफायदा घेऊन सोनम देशाबाहेर म्हणजेच नेपाळमध्ये पळून गेल्याचा दावा विपिन यांनी केला होता. तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी, यासाठी हे प्रकरण सीबीआय (CBI) कडे सोपवण्याची मागणीही त्यांनी लावून धरली होती.

सुरक्षेच्या कारणास्तव पत्ता गुप्त; जामीन अटींचे पालन करत असल्याचा दावा
आपल्या सद्यस्थितीबद्दल बोलताना सोनम म्हणाली, "न्यायालयाने मला जामीन देताना ज्या काही अटी घातल्या होत्या, त्याचे मी आजवर 100 टक्के पालन केले आहे आणि यापुढेही कधी त्यांचे उल्लंघन करणार नाही. मी सध्या शिलाँगमध्येच वास्तव्यास असून या शहराबाहेर कुठेही गेलेली नाही." सुरक्षेचा दाखला देत तिने शिलाँग मधील आपला नेमका पत्ता आणि उदरनिर्वाहाचे साधन उघड करण्यास नकार दिला. जनमत विरोधात असल्याच्या प्रश्नावर तिने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक भाष्य करणे टाळले.

वकिलांनी फेटाळले नेपाळ कनेक्शन; सोमवारी पुढील सुनावणी
सोनमला नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप तिचे वकील सुदीप राणा यांच्यावरही करण्यात आला होता. यावर तीव्र आक्षेप घेत वकील राणा म्हणाले, "माझे मूळ नेपाळी वंशाचे असले, तरी माझा जन्म, संगोपन आणि संपूर्ण शिक्षण शिलाँगमध्येच झाले आहे. नेपाळशी माझा काहीही संबंध नाही. सोनम आज स्वतः न्यायालयात हजर राहणे, हाच आम्ही देश सोडून न गेल्याचा सर्वात मोठा पुरावा आहे."

हेही वाचा – Nerul Crime News : नेरुळ हादरलं! 'बिनकामाचा' टोमणा सहन होईना; पतीने पत्नीसह सासूवरही केले चाकूने सपासप वार

या खटल्यात सध्या पूरक दोषारोपपत्रावर सुनावणी सुरू आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर, बचाव पक्षाने 'आर्म्स ॲक्ट'च्या (शस्त्र कायदा) कलमांचा संदर्भ देत सोनमचा याच्याशी संबंध नसल्याचा युक्तिवाद न्यायालयात मांडला आहे. बचाव पक्षाच्या या युक्तिवादाला उत्तर देण्यासाठी आता सरकारी वकिलांनी सोमवारपर्यंतची वेळ मागून घेतली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number