Rakhi Sawant: ‘लग्न नको, पण…’, बिग बॉसच्या घराबाहेर येताच राखीची राकेश बापट कडे अजब मागणी

शोमधून बाहेर पडल्यानंतर राखीने राकेशबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करताना एक खळबळजनक मागणी केली आहे.

Rakhi Sawant: ‘लग्न नको, पण…’,  बिग बॉसच्या घराबाहेर येताच राखीची राकेश बापट कडे अजब मागणी

Rakhi Sawant: 'ड्रामा क्वीन' राखी सावंत सध्या तिच्या 'बिग बॉस मराठी' सिझन 6 मधील प्रवासापेक्षा राकेश बापटबद्दल केलेल्या विधानांमुळे जास्त चर्चेत आली आहे. शोमधून बाहेर पडल्यानंतर राखीने राकेशबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करताना एक खळबळजनक मागणी केली आहे. "मला बाळ हवंय आणि त्यासाठी राकेशने स्पर्म डोनेट करावे," अशी इच्छा राखीने एका मुलाखतीत बोलून दाखवली आहे.

राकेशसाठी राखीचे 'एकतर्फी' प्रेम
बिग बॉसच्या घरात असताना राखी आणि राकेश बापट यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. घराबाहेर आल्यावर राखीने कबुली दिली की, तिचे राकेशवर एकतर्फी प्रेम आहे. "जगात अनेक लोकांचे प्रेम अपूर्ण राहते, माझेही राहिले तरी हरकत नाही. पण स्वप्न बघायला काय जातं? तुझ्याशिवाय राकेश, माझे जीवन अपूर्ण आहे," अशा शब्दांत तिने आपल्या मनातील भावना मांडल्या.

'विकी डोनर' बनण्याची गळ
मुलाखती दरम्यान राखीने एका खाजगी संवादाचा खुलासा केला. ती म्हणाली, "राकेश आता 47 वर्षांचा आहे, मी त्याच्यापेक्षा लहान आहे. अजून 2-3 वर्षात मूल होऊ शकतं, त्यानंतर वय निघून गेल्यावर अडचणी येतात. मी त्याला घरातच म्हटलं होतं की, तुला लग्न करायचं नसेल तर ठीक आहे, पण 'विकी डोनर' प्रमाणे माझ्या बाळासाठी स्पर्म डोनेट कर. तुला बाबा व्हायचंय का? हे ऐकून तो फक्त हसला होता."

राकेशच्या कुटुंबाला मनवण्याची तयारी
राखी पुढे म्हणाली की, जरी तिला राकेश नवरा म्हणून मिळाला नाही, तरी मित्र म्हणून तो तिच्या आयुष्यात असावा अशी तिची इच्छा आहे. "कदाचित त्याचे मन बदलेल, तो त्याच्या आई आणि बहिणीला माझ्यासाठी मनवू शकेल. मी आता शांत आणि श्रीमंत आहे," असेही तिने मिश्किलपणे नमूद केले.

हेही वाचा – Bollywood On Women Reservation: रितेश देशमुखसह बॉलीवूडमधील ‘या’ सेलिब्रिटींचा महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा; कोणाच्या काय आहेत प्रतिक्रिया?

टॉप 3 बद्दल भाकीत
बिग बॉस मराठीच्या विजेतेपदाबद्दल बोलताना राखीने राकेश बापटला पाठिंबा दिला आहे. तिच्या मते, अंतिम फेरीत राकेश, तन्वी आणि विशाल यांच्यात लढत होईल. अनुश्री लवकरच बाहेर पडेल आणि शेवटची टक्कर विशाल व तन्वीमध्ये असेल, असे भाकीतही तिने वर्तवले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number