Hyderabad Techie Tejaswini Death Mystery : 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा मृतदेह एका तलावात आढळून आला होता. सुरुवातीला परिस्थितीजन्य पुराव्यांवरून पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे मानून प्रकरण बंद केले होते. मात्र, ज्या तलावात या तरुणीचा मृतदेह सापडला, त्याच परिसरातील मंदिरातील देवीची मूर्ती चोरीला गेल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी जेव्हा मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या धक्कादायक व्हिडिओमुळे आता तरुणीचा मृत्यू आणि मूर्ती चोरीचा थेट संबंध जोडला गेला असून, या प्रकरणाचे गूढ कमालीचे वाढले आहे.
रात्रीच्या अडीच वाजता विवस्त्र अवस्थेत थरार
तेजस्विनी असे मृत तरुणीचे नाव असून, ती मूळची विजयानगर जिल्ह्यातील रहिवासी होती. मृत्यू झाला त्या रात्री ती आईसोबत जेवण करून नेहमीप्रमाणे झोपली होती, परंतु मध्यरात्री 2:30 च्या सुमारास तिने अचानक घरातून विवस्त्र अवस्थेत पळ काढला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्यानुसार, ती विवस्त्र अवस्थेत तेलंगणाच्या हैदराबादनजीक असलेल्या मेडिपल्ली येथील पीरझादीगुडा येथील मंदिरात शिरली. तिथे गेल्यानंतर तिने गर्भगृहातील अम्मावरू देवीची मूर्ती उचलली आणि थेट मंदिराच्या आवारातील तलावात मूर्तीसह उडी घेतली. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला, मात्र देवीची मूर्ती अद्याप सापडलेली नाही.
फ्लॅटचे दरमहा 1 लाख रुपये भाडे आणि लॉजचे कनेक्शन
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात अनेक धक्कादायक व आश्चर्यकारक बाबी समोर येत आहेत. तेजस्विनी ज्या फ्लॅटमध्ये राहत होती, त्याचे एका दिवसाचे भाडे 3,500 रुपये इतके प्रचंड होते, म्हणजेच ती दरमहा जवळपास 1,00,000 रुपये भाडे भरत होती. सुमारे 6 महिन्यांपूर्वी ती बंगळुरूमधील आपली आयटी (IT) क्षेत्रातील नोकरी सोडून पीरझादीगुडा येथे राहण्यास आली होती. ती राहत असलेल्या इमारतीच्या वरच्या दोन मजल्यांवर कथितरित्या एक लॉज चालवला जात होता. या लॉजचा आणि तिच्या फ्लॅटचा तेजस्विनीच्या मृत्यूशी काही संशयास्पद संबंध आहे का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
A 25-year-old former software engineer was found dead in a local temple pond just hours after CCTV cameras captured her running through the streets unclothed. Victim's medical history suggest she was battling severe depressive episodes and acute mental health distress. pic.twitter.com/84OlxOAyR3 — Swaraj Srivastava (@SwarajAjad) July 19, 2026
तपासाचे चक्र वेगाने फिरले, मूर्तीचा शोध सुरू
या गूढ मृत्यूप्रकरणी मेडिपल्ली पोलिसांनी तेजस्विनीच्या आईची कसून चौकशी केली आहे. तिच्या मृत्यूपूर्वीच्या हालचाली, तिचे आर्थिक व्यवहार आणि इतर सर्व बाजू तपासल्या जात आहेत. दुसरीकडे, आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या (DRF) एका विशेष पथकाला तलावात देवीच्या मूर्तीचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. ही मूर्ती तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा – Nanded Teacher Case : कार नदीत कोसळण्यापूर्वी घडला होता भयंकर प्रकार…, नांदेड शिक्षक प्रकरणाला धक्कादायक वळण