Crime News: चिकन करी बनवण्यावरून नवरा-बायकोत वाद; संतापलेल्या पत्नीने विळ्याने सपासप वार करून पतीला संपवलं

चिकन करी बनवण्यास नकार दिल्याने पती-पत्नीमध्ये वादाची ठिणगी पडली होती, ज्याचे रूपांतर नंतर रक्तरंजित संघर्षात झाले.

Crime News: चिकन करी बनवण्यावरून नवरा-बायकोत वाद; संतापलेल्या पत्नीने विळ्याने सपासप वार करून पतीला संपवलं

Crime News: जेवणात 'चिकन करी' बनवण्यासारख्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा शेवट एका भीषण हत्याकांडात झाला आहे. तेलंगणातील कामारेड्डी शहरात एका 28 वर्षीय महिलेने आपल्या पतीची विळ्याने सपासप वार करून संपवलं. चिकन करी बनवण्यास नकार दिल्याने पती-पत्नीमध्ये वादाची ठिणगी पडली होती, ज्याचे रूपांतर नंतर रक्तरंजित संघर्षात झाले. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.

रात्रीच्या सुमारास घरातच केला खुनी हल्ला
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 25 एप्रिलच्या रात्री घडली. 35 वर्षीय पती आणि 28 वर्षीय पत्नी यांच्यात रात्री जेवणावरून वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर पत्नीने घरात असलेला विळा उचलला आणि पतीवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला आणि अतिरक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत पती हा व्यवसायाने भंगार विक्रेता (स्क्रॅप डीलर) होता.

हेही वाचा – Raja Raghuvanshi Case : राजा रघुवंशी मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट; हनिमूनला गेल्यानंतर पतीचा गेम करणाऱ्या पत्नी सोनम रघुवंशीला जामीन मंजूर

छळ आणि व्यसनाची पार्श्वभूमी
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मृत पतीला दारूचे व्यसन होते. तो वारंवार दारू पिऊन घरी यायचा आणि पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत असे. याच कारणावरून त्यांच्यात अनेकदा भांडणे होत होती. घटनेच्या रात्रीही त्यांच्यात असाच वाद झाला आणि संतापलेल्या पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलले. मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number