Proteolytic Enzymes in Which Dal? : 'एक अशी डाळ, जी माणसाचे मांस खाते' हे विधान ऐकून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. विशेष म्हणजे, भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) मुलाखतीमध्ये हा गुंतागुंतीचा प्रश्न विचारला गेल्यामुळे सोशल मीडियावर याची प्रचंड चर्चा रंगली आहे. पण घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण ही डाळ दुसरी तिसरी कोणतीही नसून आपल्या सर्वांच्या रोजच्या आहारातील आवडीची 'हिरवी मूग डाळ' आहे. मूग डाळ प्रत्यक्षपणे कोणाचेही मांस खात नाही, तर शरीरातील एका महत्त्वपूर्ण शास्त्रीय प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी गमतीने हा वाक्प्रचार वापरला जातो.
'मांस खाणारी डाळ' म्हणण्यामागचे वैज्ञानिक कारण
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, हिरव्या मूग डाळीमध्ये ‘प्रोटीओलाइटिक एन्झाईम्स’ (Proteolytic Enzymes) नावाचे विशेष प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात. जेव्हा आपण या डाळीचे सेवन करतो, तेव्हा हे एन्झाईम्स आपल्या शरीरात सक्रिय होतात आणि शरीरातील टाकाऊ घटक पचवण्याचे काम करतात. ही एन्झाईम्स शरीरात जमा झालेली नको असलेली अतिरिक्त चरबी (Fat) आणि मृत पेशी (Dead Cells) नष्ट करण्यास मदत करतात. ती शरीरातील हे अनावश्यक मांस (चरबी) जाळून टाकत असल्यामुळेच तिला गमतीने 'माणसाचे मांस खाणारी डाळ' असे संबोधले जाते.
हेही वाचा – Ragi Khakhra Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी बेस्ट! कमी तेलात तयार करा कुरकुरीत नाचणीचा खाकरा
मूग डाळीचे आरोग्यदायी फायदे आणि इतिहास
अतिशय प्राचीन इतिहास असलेल्या मूग डाळीचा शोध सुमारे 4000 वर्षांपूर्वी सध्याच्या कर्नाटक परिसरात लागला होता असे मानले जाते. मूग डाळ ही सर्व डाळींमध्ये अत्यंत पौष्टिक आणि पचायला सर्वात हलकी मानली जाते. यात भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पचनसंस्था उत्तम राहते आणि पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी ही डाळ अत्यंत उपयुक्त ठरते. याशिवाय, मूग डाळीला प्रथिनांचा (Proteins) खजिना म्हटले जाते आणि यातील पोटॅशियम व मॅग्नेशियम हे घटक उच्च रक्तदाब (High Blood Pressure) नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.