Crime News: लपाछपीचा खेळ खेळताना भयंकर कांड; 5 अल्पवयीन मुलांनी 9 वर्षांच्या चिमुरडीसोबत केलं नको ते कृत्य

गावातील 6 ते 7 मुले एकत्र येऊन लपाछपीचा खेळ खेळत होती. लपण्याच्या नादात ही मुले शेजारीच असलेल्या एका शेतात गेली.

Crime News: लपाछपीचा खेळ खेळताना भयंकर कांड; 5 अल्पवयीन मुलांनी 9 वर्षांच्या चिमुरडीसोबत केलं नको ते कृत्य

Crime News:  उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्ह्यामधून एक अत्यंत चिंताजनक घटना उघडकीस आली आहे. तिलहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बख्तियारपूर गावातील एका शासकीय प्राथमिक शाळेजवळ खेळत असताना हा प्रकार घडला. गावातील 6 ते 7 मुले एकत्र येऊन लपाछपीचा खेळ खेळत होती. लपण्याच्या नादात ही मुले शेजारीच असलेल्या एका शेतात गेली. शेतमालकाने जेव्हा या मुलांना शेतात पाहिले, तेव्हा त्याने तात्काळ मुलीच्या नातेवाईकांना बोलावून याबाबत माहिती दिली. त्यानंतर पीडित 9 वर्षीय बालिकेच्या पालकांनी पोलिसांत धाव घेत 5 अल्पवयीन मुलांवर अत्याचाराचा गंभीर आरोप करत तक्रार नोंदवली आहे.

आरोपी मुलांचे वय पाहून पोलीसही अवाक; कायद्यानुसार चौकशी सुरू
या प्रकरणातील सर्वात चक्रावून टाकणारी बाब म्हणजे ज्या मुलांवर आरोप करण्यात आले आहेत, ती स्वतः वयवर्षे 7 ते 12 दरम्यानची लहान मुले आहेत. आरोपींमध्ये काही मुले 7 वर्षांची, काही 10 वर्षांची तर काही 12 वर्षांची आहेत. इतक्या लहान वयातील मुलांवर अशा स्वरूपाचे गंभीर आरोप झाल्याने पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. बाल हक्क कायदे आणि बालकल्याण मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करत, पोलिसांनी सर्व आरोपी मुलांना त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यात आणून प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा – Palghar Crime : लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, बेकायदा गर्भपाताचेही प्रकरण उघडकीस; आरोपीला अटक

वैद्यकीय चाचणी आणि वैद्यकीय पुराव्यांवर तपासाची भिस्त
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 9 वर्षांच्या पीडित बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी स्थानिक रुग्णालयात पाठवले आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना तिलहरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विदुष सक्सेना यांनी स्पष्ट केले की, पीडितेच्या कुटुंबाने दिलेल्या फिर्यादीवरून योग्य कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

वैद्यकीय अहवाल, घटनास्थळाची पाहणी आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे घटनेतील सत्यासत्यता तपासली जात असून, त्यानुसारच पुढील कायदेशीर पावले उचलली जातील. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र चिंता व्यक्त केली जात असून, लहान मुलांच्या वाढत्या कौटुंबिक आणि सामाजिक वातावरणावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number