PM Kisan 23rd Installment Date: शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचे 2000 रुपये

थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवली जाणार असून, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीकामांसाठी आणि घरगुती खर्चासाठी मोठा आर्थिक हातभार लागणार आहे.<br/>

PM Kisan 23rd Installment Date: शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचे 2000 रुपये

PM Kisan 23rd Installment Date: देशातील कोट्यवधी अन्नदात्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना' (PM-Kisan) च्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपयांची सन्मान निधी रक्कम कधी जमा होणार, याची अधिकृत घोषणा अखेर सरकारने केली आहे. थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवली जाणार असून, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीकामांसाठी आणि घरगुती खर्चासाठी मोठा आर्थिक हातभार लागणार आहे.

या दिवशी जमा होणार 2,000 रुपये
योजनेच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वरून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, या योजनेचा 23 वा हप्ता 20 जून 2026 रोजी देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. यापूर्वी हा हप्ता जून महिन्याच्या शेवटी येण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु सरकारने तारीख आधीच स्पष्ट केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत प्रत्येकी 2,000 रुपये थेट बँक खात्यात पाठवले जातील.

काय आहे 'पीएम किसान' योजना?
शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी केंद्र सरकारने 24 फेब्रूवारी 2019 रोजी 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना' सुरू केली होती. या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला एकूण 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये वर्षभरात टप्प्याटप्प्याने जमा केली जाते. सरकारने आतापर्यंत यशस्वीरी्या 22 हप्ते वितरीत केले असून, आता 23 वा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

'या' चुकांमुळे हप्ता रोखला जाऊ शकतो
सरकारने तारीख जाहीर केली असली, तरी सर्वच नोंदणीकृत शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल असे नाही. ज्या लाभार्थ्यांनी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केलेल्या नाहीत, त्यांचे पैसे अडकू शकतात. खालील त्रुटींमुळे हप्ता रोखला जाण्याची शक्यता आहे:

– लाभार्थ्यांचे 'ई-केवायसी' (e-KYC) अपूर्ण असणे.
– शेतकऱ्याकडे वैध 'फार्मर आयडी' (Farmer ID) नसणे.
– बँक खात्याच्या माहितीत चुका असणे (उदा. चुकीचा खाते क्रमांक किंवा IFSC कोड).

हेही वाचा – CNG-PNG Price Hike: सीएनजी-पीएनजी दरात पुन्हा वाढ; ग्राहकांना मोठा धक्का, जाणून घ्या किती रुपयांची वाढ झाली?

घरबसल्या अशी तपासा तुमचे स्टेटस  
तुमच्या खात्यात 23 व्या हप्त्याचे पैसे येणार की नाही, हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने सहज तपासू शकता. त्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा:

– सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला (Website) भेट द्या.
– तेथील 'Farmers Corner' या विभागात जाऊन 'Know Your Status' या पर्यायावर क्लिक करा.
– तुमचा नोंदणी क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा (Captcha) कोड टाकून सबमिट करा.

या ठिकाणी तुम्हाला ई-केवायसी, बँक खाते जोडणी आणि जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे की नाही, याची संपूर्ण माहिती मिळेल. जर तुमचा आधीचा एखादा हप्ता काही त्रुटींमुळे थांबला असेल आणि आता तुम्ही ती प्रक्रिया पूर्ण केली असेल, तर पडताळणीनंतर जुने रखडलेले पैसेही तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number