Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये वाढ; दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांमधील दर काय? वाचा

ऑक्टोबरमध्ये उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या किमतींमध्ये काहीशी स्थिरता दिसली होती. मात्र, अमेरिकन अर्थव्यवस्थेतील मंदीच्या चिंतेमुळे पुन्हा गुंतवणूकदारांनी सोन्याकडे कल वाढवला आहे.

Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये वाढ; दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांमधील दर काय? वाचा

Gold Silver Rate: सध्या सर्वत्र लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. परंतु, आता सोने खरेदी करणाऱ्यांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 1200 रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी देशांतर्गत कमोडिटी बाजारात सोन्या-चांदीच्या दरात तेजीचा कल दिसून आला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबर कराराच्या सोन्याच्या किमतीत 1.12 टक्के वाढ झाली असून, दर 1,22,426 प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीने 1.93 टक्के वाढीसह 1,50,579 प्रति किलोग्रॅम दर गाठले आहेत. 

या वाढीमागे जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून संभाव्य व्याजदर कपात होण्याची अपेक्षा हे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक साधन म्हणून सोन्याकडे वळल्याने मागणीत वाढ झाली आहे.

हेही वाचा – Aadhaar ATM: आधार एटीएम म्हणजे काय? तुमचे वॉलेट हरवल्यास पैसे काढण्यासाठी त्याचा कसा वापर करावा?

आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजी  

ऑक्टोबरमध्ये उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या किमतींमध्ये काहीशी स्थिरता दिसली होती. मात्र, अमेरिकन अर्थव्यवस्थेतील मंदीच्या चिंतेमुळे पुन्हा गुंतवणूकदारांनी सोन्याकडे कल वाढवला आहे. फेड दर कपात होण्याच्या शक्यतेमुळे व्याज नसलेल्या मालमत्ता (जसे की सोने-चांदी) अधिक आकर्षक ठरत आहेत.

सोन्याच्या दीर्घकालीन परताव्याचा प्रवास

दरम्यान, 2005 मध्ये सोन्याचा दर 7,638 प्रति 10 ग्रॅम होता. 2025 मध्ये तो वाढून 1,25,000 पेक्षा जास्त झाला आहे. म्हणजेच, गेल्या 20 वर्षांत गुंतवणूकदारांना जवळपास 1,200 टक्के परतावा मिळाला आहे. या दोन दशकांपैकी 16 वर्षांत सोन्याने सकारात्मक परतावा दिला आहे. फक्त या वर्षात (YTD)च सुमारे 56 टक्के वाढ झाली आहे.

हेही वाचा – 31 डिसेंबरपूर्वी 'हे' काम पूर्ण करा; नाहीतर, पॅन कार्ड होईल निष्क्रिय! मग पगार जमा होणार नाही आणि ITR ही भरता येणार नाही

प्रमुख शहरांतील आजचे दर 

आजच्या व्यवहारात चेन्नईत सर्वाधिक दर नोंदवला गेला आहे.

चेन्नई: 12,448 (24K), 11,410 (22K), 9,515 (18K)

मुंबई: 12,322 (24K), 11,295 (22K), 9,242 (18K)

दिल्ली: 12,337 (24K), 11,310 (22K), 9,257 (18K)

कोलकाता: 12,322 (24K), 11,295 (22K), 9,242 (18K)

बेंगळुरू, हैदराबाद, केरळ, पुणे: सरासरी 12,322 (24K), 11,295 (22K), 9,242 (18K)

अहमदाबाद आणि वडोदरा: 12,327 (24K), 11,300 (22K), 9,247 (18K)

तज्ज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही आठवड्यांत सोन्याच्या किमतींमध्ये आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा काळ सावध पण संधी निर्माण करणारा मानला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number