Dead Man Returns : धक्कादायक ट्विस्ट! अंत्यसंस्कार झालेल्या व्यक्तीने वाजवली घराची बेल; कुटुंबीयांनी खुनाचा गुन्हाही नोंदवला होता

गिरधर यांना डोळ्यांसमोर जिवंत पाहताच घरात आनंदाचे आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले, तर दुसरीकडे पोलिसांच्या तपासावर खूप मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Dead Man Returns : धक्कादायक ट्विस्ट! अंत्यसंस्कार झालेल्या व्यक्तीने वाजवली घराची बेल; कुटुंबीयांनी खुनाचा गुन्हाही नोंदवला होता

Ghaziabad Dead Man Returns : एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही मागे टाकेल अशी एक अजब घटना गाझियाबादमध्ये समोर आली आहे. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजून कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला, रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले, एवढेच नव्हे तर 'तेरावा' घालून पोलिसात खुनाचा गुन्हाही नोंदवला, तीच व्यक्ती अचानक दारात जिवंत उभी राहिली. गिरधर सिंग बिष्ट असे या 38 वर्षीय व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या या थरारक पुनरागमनाने वैशाली येथील कल्पना अपार्टमेंटमधील त्यांच्या कुटुंबाला आणि शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. गिरधर यांना डोळ्यांसमोर जिवंत पाहताच घरात आनंदाचे आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले, तर दुसरीकडे पोलिसांच्या तपासावर खूप मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

तुरुंगातून सुटका, बेपत्ता आणि संशयास्पद मृत्यूचा बनाव
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 16 मे रोजी झाली, जेव्हा गिरधर यांचा स्थानिक दुकानदारांशी वाद झाला होता. मानसिकदृष्ट्या काहीसे अस्थिर असलेल्या गिरधर यांना शांतता भंगाच्या कारणावरून कौशांबी पोलिसांनी ताब्यात घेऊन दासना तुरुंगात पाठवले होते. त्यानंतर 21 मे रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली, पण ते घरी न जाता कुठेतरी निघून गेले. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. दरम्यान, 13 जून रोजी मसुरी पोलिसांना एक अज्ञात मृतदेह आढळला. पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी बोलावले असता, काळजीने खचलेल्या कुटुंबीयांनी तो मृतदेह गिरधर यांचाच असल्याचे समजून ताब्यात घेतला आणि त्यावर अंत्यसंस्कार केले.

हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : उद्धव ठाकरेंनी राम मंदिरात दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट गायब; संजय राऊतांनी केली सखोल चौकशीची मागणी

पोलिसांत खुनाचा गुन्हा आणि कुटुंबीयांचा संताप
गिरधर यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला होता, पण त्यांना या मृत्यूमागे घातपाताचा संशय होता. गिरधर यांची हत्या करण्यात आली असा आरोप करत नातेवाईकांनी कौशांबी पोलीस ठाण्याबाहेर तीव्र निदर्शने केली. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत अखेर मसुरी पोलिस ठाण्यात काही संशयित आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा (कलम 302) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू केल्यामुळे अनेक संशयित कुटुंबांवर अटकेची टांगती तलवार निर्माण झाली होती आणि संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण होते.

या प्रकाराने मोठी गुंतागुंत; मग तो अज्ञात मृतदेह कोणाचा होता?
घरात तेराव्याचे विधी आटोपून काहीच दिवस झाले असताना, एका गुरुवारी अचानक गिरधर प्रत्यक्ष घरी परतले. त्यांना पाहून आधी कोणाचाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच कल्पना अपार्टमेंटबाहेर लोकांची प्रचंड गर्दी जमली. गिरधर जिवंत परतल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असला, तरी पोलिसांसमोर आता सर्वात मोठे आव्हान उभे राहिले आहे. गिरधर जिवंत असतील, तर मसुरी पोलिसांना सापडलेला आणि कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केलेला तो अज्ञात मृतदेह नेमका कोणाचा होता? आणि पोलिसांनी केवळ नातेवाईकांच्या सांगण्यावरून शवविच्छेदनानंतर मृतदेह सोपवला कसा? या प्रश्नांनी आता गूढ वाढवले आहे.

हेही वाचा – Dead Fly Found In Train Food: तेजस एक्सप्रेसमध्ये किळसवाणा प्रकार; शाकाहारी बिर्याणीत आढळली मेलेली माशी; फोटो पाहून नेटकऱ्यांचा संताप

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number