गजकेसरी राजयोग पालटणार भाग्य! 29 एप्रिलपासून ‘या’ राशींवर यश आणि आर्थिक लाभांचा वर्षाव

गुरू आणि चंद्र आता वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहेत. ज्यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, हा एक शुभ आणि शक्तिशाली योग मानला जातो. हा योग गुरु आणि चंद्राच्या युतीने तयार होतो.

गजकेसरी राजयोग पालटणार भाग्य! 29 एप्रिलपासून ‘या’ राशींवर यश आणि आर्थिक लाभांचा वर्षाव

Gajkesari Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ग्रहाला समृद्धी आणि मान सन्मानाचा कारक मानले जाते. तसेच चंद्राला मनाचा कारक मानले जाते. 29 एप्रिल रोजी चंद्र वृषभ राशीत गुरुशी युती करेल. यावेळी चंद्र आणि गुरुच्या युतीने गरकेसरी राजयोग निर्माण होईल, जो 12 राशींपैकी 3 राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो.

वैदिक ज्योतिषशास्त्रात गजकेसरी राजयोग सर्वात शुभ मानला जातो. या राजयोगात जन्मलेली व्यक्ती भविष्यात राजासारखे जीवन जगते असे मानले जाते. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर पूर्ण मेहनत घेत मात करते आणि शेवटी यश मिळवत आनंदी, समृद्धदायी जीवन जगते. यात हा राजयोग धनाचा कारक ग्रह गुरु आणि मनाचा कारक ग्रह चंद्र यांच्या संयोगातून तयार होत आहे. यात चंद्र हा सर्वात वेगवान ग्रह मानला जातो. चंद्राचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होऊन शुभ, अशुभ योग तयार होत असतात.

हेही वाचा – नखांचा रंग बदलल्याने आयुष्य बदलू शकते का? जाणून घ्या, काय आहे 'ग्रीन नेल थिअरी'..

गजकेसरी योग कसा तयार होतो?
गुरु आणि चंद्र एकाच राशीत एकत्र आल्याने गजकेसरी योग होतो. गुरु ज्या राशीत असेल त्या राशीपासून चौथ्या, सातव्या आणि दहाव्या घरात चंद्र असतो, तेव्हा गजकेसरी योग तयार होतो. चंद्राचा गुरु ग्रहासह मध्य स्थानात म्हणजेच आरोही, चतुर्थ आणि दहावा भाव असेल तर हा योग तयार होतो.
यात 29 एप्रिल रोजी चंद्र गुरु ग्रहाशी युती करून गजकेसरी राजयोग निर्माण करणार आहे. या राजयोगाने १२ राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होतील. पण अशा 3 राशी आहेत, ज्यांचे नशीब उजळू शकते. चला जाणून घेऊया, या राशींबद्दल… चंद्र 29 एप्रिल रोजी पहाटे 2 वाजून 53 मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करेल आणि 1 मे पर्यंत या राशीत राहील.

गजकेसरी योगाचे फायदे
हा योग शिक्षण, करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यास मदत करतो. या योगावर जन्मलेले लोक बुद्धिमान, आध्यात्मिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. या योगाचे लोक गुणवान, ज्ञानी आणि उत्तम गुणांचे असतात. या योगाचे लोक कमी समयातच धनवान बनतात. या योगाचे लोक राजसी सुख आणि समाजात मान-सन्मान मिळवतात. या योगाचे लोक सर्वात मोठ्या संकटातून बाहेर पडून यशस्वी होतात.

या राजयोगमुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच या राशींच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. करीअरमध्ये प्रगती होऊ शकते.याशिवाय, या राजयोगावर जन्मलेल्या बाळांनाही त्यांच्या जीवनात अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतात. जाणून घेऊ, सध्या या राजयोगामुळे कोणत्या राशींना नशिबाची साथ मिळणार आहे…

वृषभ (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग भाग्यशाली ठरू शकतो. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आर्थिक संकटातून सुटका होऊ शकते. कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल. या वेळी या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येऊ शकतात. मुलांकडून येणाऱ्या अडचणी आता संपुष्टात येऊ शकतात. लव्ह लाईफ चांगली असेल. विवाहित लोकांचे वैवाहिक आयुष्य उत्तम राहील. अविवाहित लोकांना लग्नाचे योग जुळून येईल. व्यवसायात नफा मिळू शकतो. धनलाभाचे योग जुळून येईल. आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकेल.

कर्क (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी खूप फायदे मिळू शकतात. तुम्ही करत असलेल्या कामातून तुम्हाला यश मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होईल. यामुळे वरिष्ठ अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी आनंदी असतील, ज्यामुळे तुम्हाला बोनस, पगारवाढ तसेच पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकते. तुमच्या नेतृत्व क्षमतेत वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. पैसे गुंतवून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण अनुभवता येतील.

हेही वाचा – 'या' तीन राशींना अचानक होईल धनलाभ; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन भरभरून देणार

कन्या (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठीही गजकेसरी राजयोग फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुमचा कल अध्यात्माकडे अधिक असेल, ज्यामुळे तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकाल. करिअरमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल अनुभवता येतील. यासह , तुम्हाला प्रगती साधण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतील. कुटुंबासह कोणत्याही तीर्थस्थळी किंवा परदेशात प्रवासाचा योग जुळून येईल. हा गोचर विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरू शकतो. तसेच जर सरकारी नोकरी संदर्भात हे लोक परीक्षा देत असतील तर त्यांना यश मिळू शकते. त्यामुळे या वेळी या लोकांना नशीबाची साथ मिळेल. तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळू शकेल. प्रगतीचे अनेक मार्ग खुले होऊ शकतात. तुम्ही नकारात्मक विचारांपासून दूर राहाल, ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. व्यवसाय क्षेत्रातही नफा मिळवण्याच्या अनेक संधी आहेत. लव्ह लाइफ देखील चांगली राहणार आहे. तुमचा जोडीदार आणि कुटुंबासह चांगला वेळ जाईल. या राशीचे लोक धार्मिक आणि मंगल कार्यात सहभागी होऊ शकतात.

(Disclaimer :  येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number