Nutrition in Mangoes : मँगो लव्हर्ससाठी महत्त्वाची बातमी! आंबा खाल्ल्याने वजन वाढतं की घटतं? जाणून घ्या, एका दिवसात किती आंबे खावेत

आंबा पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्यामुळे तो आरोग्यासाठी उत्तम मानला जातो, मात्र त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे.

Nutrition in Mangoes : मँगो लव्हर्ससाठी महत्त्वाची बातमी! आंबा खाल्ल्याने वजन वाढतं की घटतं? जाणून घ्या, एका दिवसात किती आंबे खावेत

Nutrition in Mangoes : फळांचा राजा मानला जाणारा आंबा हे फळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच प्रचंड आवडते असते. चवीला अतिशय गोड, स्वादिष्ट आणि रसाळ असलेले हे फळ सर्वांना वेगवेगळ्या पद्धतींनी खायला आवडतो. काही जण आंबा कापून खातात, तर काही मँगो शेक, आमरस किंवा ज्यूस बनवून त्याचा आस्वाद घेतात. उन्हाळ्याच्या दिवसांत येणारे हे फळ भारतीयांच्यात अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र, आंबा खाण्याबाबत अनेकांच्या मनात एक मोठा संभ्रम असतो, तो म्हणजे 'आंबे खाल्ल्याने वजन वाढते का?' योग्य माहिती नसल्यामुळे अनेक जण आंबा खाणे टाळतात. परंतु, आहारतज्ज्ञांच्या मते, कोणतीही शंका न बाळगता तुम्ही मनसोक्त आंबे खाऊ शकता, कारण आंबा हे मुळात एक कमी कॅलरी (Low Calorie) असलेले फळ आहे.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आंबा खाण्याची योग्य पद्धत
आंबा पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्यामुळे तो आरोग्यासाठी उत्तम मानला जातो, मात्र त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे. योग्य प्रमाणात आंबा खाल्ल्यास वजन वाढत नाही आणि शरीरातील साखरेची पातळीही (Sugar Level) नियंत्रणात राहते. हे मर्यादित प्रमाण जाणून घेणे आवश्यक आहे. वजन वाढू नये म्हणून तुम्ही एका वेळी फक्त 100 ग्रॅम आंबाच खाल याची काळजी घ्यावी. आंबा खूप आवडत असला तरी अति खाणे टाळा. आंबा खाणे आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. परंतु, अतिप्रमाणात खाल्ल्यास कॅलरीज वाढून वजनावर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा – Mango Ice Cream : रसाळ आंब्यांचा थंडगार आस्वाद; अशा सोप्या पद्धतीने बनवा मँगो आईस्क्रीम!

आंब्यामध्ये असणारे प्रमुख पोषक घटक
उन्हाळ्यात आंबा खाल्ल्याने शरीराला आवश्यक असणारी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे नैसर्गिकरीत्या मिळतात. आंब्यामध्ये पोषक तत्वांचा भरपूर साठा असतो.
– व्हिटॅमिन्स: आंबा खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन A, C आणि E चा पुरवठा होतो.
– खनिजे (Minerals): यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आढळतात.
– फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स: हे घटक शरीराला आतून सुदृढ ठेवण्याचे काम करतात.

आंबा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
आंब्यामध्ये उत्तम प्रमाणात फायबर, खनिजे आणि जीवनसत्त्वे असल्यामुळे शरीराच्या विविध भागांसाठी तो अत्यंत गुणकारी ठरतो.
– पचनसंस्था निरोगी राहते: आंब्याचे सेवन केल्याने अपचन, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता (Constipation) यांसारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
– हृदयाचे आरोग्य: आंब्यामध्ये असलेले फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.
– रोगप्रतिकारशक्ती वाढते: आंब्यामध्ये असणारे व्हिटॅमिन C शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि उन्हाळ्यातील हंगामी आजारांपासून तुमचे संरक्षण करते.

हेही वाचा – Ragi Khakhra Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी बेस्ट! कमी तेलात तयार करा कुरकुरीत नाचणीचा खाकरा

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे. जय महाराष्ट्र याचा दावा करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number