Dhurandhar 2 OTT Release Soon : रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असलेल्या 'धुरंधर 2: द रिव्हेंज' या चित्रपटाने सिनेमागृहांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 1700 कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून, अनेक ठिकाणी हा चित्रपट अजूनही हाऊसफुल आहे. जर या चित्रपटाने 2000 कोटींचा टप्पा पार केला, तर तो आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटाचा विक्रम मोडीत काढेल. या भव्य यशानंतर आता हा चित्रपट घराघरात पोहोचण्यासाठी सज्ज झाला असून प्रेक्षकांमध्ये ओटीटी रिलीजबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
विक्रमी डिजिटल डील आणि प्लॅटफॉर्म
धुरंधरचा पहिला भाग नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता, मात्र दुसऱ्या भागासाठी निर्मात्यांनी वेगळी वाट निवडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'धुरंधर 2' चे डिजिटल हक्क 'जिओ हॉटस्टार'ने सुमारे 150 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील ही सर्वात फायदेशीर ओटीटी डील मानली जात आहे. जिओ आणि हॉटस्टारच्या विलीनीकरणानंतर प्रदर्शित होणारा हा पहिलाच मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार आहे. निर्मात्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी, हा चित्रपट 14 मे 2026 रोजी ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा – Actress Tragic Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचा वयाच्या 30 व्या वर्षी संशयास्पद मृत्यू; चाहत्यांना मोठा धक्का
चित्रपटाचे कथानक आणि कलाकार
या चित्रपटात रणवीर सिंह एका भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत असून, तो दहशतवादी नेटवर्क नष्ट करण्यासाठी अंडरवर्ल्डमध्ये घुसखोरी करतो. 'धुरंधर 2' चे कथानक 2001 चा संसद हल्ला, 26/11 मुंबई हल्ला आणि कंधार विमान अपहरण अशा वास्तविक घटनांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या भागात रणवीर सिंहसोबत आर. माधवन आणि संजय दत्त यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 18 मार्च रोजी या चित्रपटाचा पेड प्रीमियर झाला होता आणि त्यानंतर 19 मार्चला तो सर्व दक्षिण भारतीय भाषांसह हिंदीत प्रदर्शित झाला.
ओटीटी प्रदर्शनाची प्रतीक्षा संपली
साधारणपणे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यांत ओटीटीवर येतो, परंतु, 'धुरंधर 2' च्या बाबतीत ही वेळ थोडी वाढवण्यात आली होती कारण चित्रपटगृहांमध्ये अजूनही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. व्यापार तज्ञांच्या मते, जिओ हॉटस्टारवर हा चित्रपट सर्वाधिक पाहिला जाणारा कंटेंट ठरू शकतो. पहिल्या भागाच्या तुलनेत या भागात अधिक थरार आणि जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. लवकरच निर्माते आणि जिओ स्टुडिओज याच्या प्रदर्शनाच्या तारखेची अधिकृत मोहोर उमटवतील अशी अपेक्षा आहे.