Dharmendra Business List: सिनेमातील ‘ही-मॅन’ ते करोडपती उद्योजक; धर्मेंद्र यांनी रिअल इस्टेट ते रेस्टॉरंटपर्यंत कुठे-कुठे केली होती गुंतवणूक

धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती 450 कोटींच्या आसपास होती. अभिनयाच्या पलीकडे जाऊन त्यांनी रिअल इस्टेट, शेती, हॉटेल व्यवसाय, आणि चित्रपट निर्मिती यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती.<br/>

Dharmendra Business List: सिनेमातील ‘ही-मॅन’ ते करोडपती उद्योजक; धर्मेंद्र यांनी रिअल इस्टेट ते रेस्टॉरंटपर्यंत कुठे-कुठे केली होती गुंतवणूक

Dharmendra Business List: बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. काही महिन्यांपासून ते प्रकृतीच्या समस्यांनी त्रस्त होते आणि अलीकडेच त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. पडद्यावर दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात स्थान मिळवणारे धर्मेंद्र हे व्यवसाय जगतातही तितकेच यशस्वी होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती 450 कोटींच्या आसपास होती. अभिनयाच्या पलीकडे जाऊन त्यांनी रिअल इस्टेट, शेती, हॉटेल व्यवसाय, आणि चित्रपट निर्मिती यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती.

रिअल इस्टेटमध्ये भक्कम गुंतवणूक

धर्मेंद्र यांच्या संपत्तीचा सर्वात मोठा वाटा रिअल इस्टेटमध्ये होता. लोणावळ्यामध्ये त्यांचे 100 एकरचे मोठे फार्महाऊस होते, ज्याची किंमत कोटींमध्ये होती. महाराष्ट्रात त्यांची अनेक घरे होती, ज्याची किंमत 17 कोटींपेक्षा जास्त होती. त्यांच्याकडे अंदाजे 14 कोटींची शेती आणि बिगरशेती जमीन देखील होती. त्यांच्या फार्महाऊसजवळ 30 कॉटेज असलेले एक लक्झरी रिसॉर्ट बांधण्याची त्यांची योजना होती असे वृत्त आहे.

हेही वाचा – politicians On Dharmendra : बॉलिवूडच्या ‘ही-मॅन’ला 89 व्या वर्षी निरोप! राजकीयवर्तूळातून भावपूर्ण श्रद्धांजली

रेस्टॉरंट क्षेत्रात दमदार एन्ट्री

दरम्यान, 2015 मध्ये धर्मेंद्र यांनी दिल्लीतील ‘गरम धरम ढाबा’ या रेस्टॉरंटद्वारे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या देसी अंदाजाने सजलेले हे ठिकाण काही दिवसांतच लोकप्रिय झाले. 2022 मध्ये त्यांनी कर्नाल हायवेवर ‘ही-मॅन’ नावाचे आणखी एक उत्कृष्ट रेस्टॉरंट सुरू केले.  

चित्रपट निर्मितीतूनही चांगले उत्पन्न

धर्मेंद्र यांनी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू करून ‘यमला पगला दीवाना’सारखे चित्रपट तयार केले. या बॅनरमधून त्यांना नियमित उत्पन्न मिळत असे.

हेही वाचा – Dharmendra Death : धर्मेंद्र यांच्या पार्थिवाला सनी देओलने दिला मुखाग्नी ; हेमा मालिनींची अवस्थाही बघवेना

महागड्या गाड्यांची आवड  

धर्मेंद्र यांच्याकडे 1960 च्या Fiat पासून ते Range Rover Evoque आणि Mercedes-Benz SL500 पर्यंत अनेक लक्झरी गाड्या होत्या. यातील काही वाहनांची किंमत लाखांत तर काहींची किंमत कोटींमध्ये आहे. बॉलिवूडमध्ये सुपरस्टार असतानाच धर्मेंद्र यांनी व्यवसायातही प्रचंड यश मिळवून “ही-मॅन” या प्रतिमेला न्याय दिला. त्यांच्या मेहनतीने, दृष्टीने आणि शिस्तीने उभी केलेली संपत्ती आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देते.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number