Honour Killing: प्रतिष्ठा वाचवण्यासाठी पोटच्या लेकीचा बळी! अविवाहित गर्भवती तरुणीला बापानेच… नदीत ढकलण्यापूर्वी तिच्या पायाला स्पर्श करत…

कौटुंबिक प्रतिष्ठेच्या नावाखाली रचलेल्या या कटात आरोपी बापाने एका नातेवाईकाच्या मदतीने पोटच्या मुलीला संपवलं.

Honour Killing: प्रतिष्ठा वाचवण्यासाठी पोटच्या लेकीचा बळी! अविवाहित गर्भवती तरुणीला बापानेच… नदीत ढकलण्यापूर्वी तिच्या पायाला स्पर्श करत…

Honour Killing Horrible Incident: दिल्लीतून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि संतप्त करणारी बातमी समोर आली आहे. अविवाहित मुलगी सुमारे 3 महिन्यांची गर्भवती असल्याचे समजताच समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीने 52 वर्षीय बापानेच आपल्याच पोटच्या 18 वर्षीय लेकीची निर्घृण हत्या केली. कौटुंबिक प्रतिष्ठेच्या (Honour Killing) नावाखाली रचलेल्या या कटात आरोपी बापाने एका नातेवाईक जावयाची मदत घेत मुलीला आग्र्याजवळील चंबळ नदीत ढकलून दिले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.  

उपचाराचे आमिष दाखवून आग्र्याला नेले; ती भीषण रात्र  
दक्षिण दिल्लीत राहणाऱ्या या मृत तरुणीला वैद्यकीय उपचारासाठी औषध पुरवण्याचा बहाणा करून आरोपींनी 28 जुलै रोजी दिल्लीहून आग्र्याला आणले होते. त्या रात्री त्यांनी आग्र्यातील एका नातेवाईकाच्या घरी मुक्काम केला. तपासादरम्यान पोलिसांनी तिघांचेही मोबाईल लोकेशन्स तपासले असता, तरुणीसह दोन्ही आरोपी एकाच वेळी आग्र्यात आल्याचे स्पष्ट झाले. 31 जुलै रोजी पोलिसांना पीसीआर (PCR) कॉलद्वारे या हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली.  

हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर हादरलं! सहावीतील विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग; पाच ते सहा वेळा…

'नदीत उडी मार'; नकार दिल्यावर पाया पडले अन ढकलून दिले पाण्यात 
दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी तरुणीला आग्र्याजवळील बसोनी परिसरातील चंबळ नदीच्या काठावर घेऊन गेले. तेथे त्यांनी आधी तरुणीवर स्वतःहून नदीत उडी मारण्यासाठी दबाव आणला, मात्र तिने स्पष्ट नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर बापाने मुलीच्या पायांना स्पर्श केला आणि क्षमा मागून दोघांनी मिळून तिला बळजबरीने चंबळ नदीच्या पात्रात ढकलून दिले. या क्रूर कृत्यानंतर आरोपी कोणतीही भिती न बाळगता पुन्हा दिल्लीला निघून आले.  

दोन्ही आरोपी अटकेत; चंबळ नदीत मृतदेहाचा शोध सुरू  
दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त (DCP) अनंत मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीने आरोपी वडिलांनी नातेवाईकासोबत मिळून कट रचला आणि मुलीला पाण्यात बुडवून तिची हत्या केली. या प्रकरणी दोन्ही मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे. दरम्यान, चंबळ नदीच्या पात्रात बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह शोधण्यासाठी कुशल पाणबुडे आणि विशेष बचाव पथकांकडून (Rescue Teams) मोठे शोध अभियान राबवले जात आहे.

हेही वाचा – Nandurbar Crime : मोबाईलमध्ये 200 हून अधिक व्हिडिओ, 5 वर्षांपासून शोषण आणि…, नंदुरबारमधून धक्कादायक प्रकार समोर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number