Pit Bull Dog Attacks Child In Delhi : दिल्लीतील प्रेम नगर भागात पिट बुल जातीच्या कुत्र्याने एका 6 वर्षांच्या लहान मुलावर जीवघेणा हल्ला (Pit Bull Dog Deadly Attack) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात पीडित मुलाला गंभीर दुखापत (Serious Injury in Dog Attack) झाली असून, त्याला आपला उजवा कान गमवावा लागला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत कुत्र्याचा मालक राजेश पाल (Rajesh Pal) याला अटक केली आहे.
नेमके काय घडले?
ही घटना रविवारी संध्याकाळी 5.38 वाजता विनय एन्क्लेव्ह येथे घडली. पीडित मुलगा घराबाहेर खेळत असताना शेजाऱ्याच्या घरातून अचानक पिट बुल डॉग बाहेर आला आणि त्याने मुलावर हल्ला केला. मुलाच्या आजोबांनी एका राष्ट्रीय वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, मुलाने फेकलेला बॉल चुकून पिटबुलला बांधलेल्या घराकडे गेला. तेव्हा पिटबुलने साखळी तोडून मुलावर हल्ला केला.
मुलाला गंभीर दुखापत
कुत्र्याने मुलाच्या उजव्या कानाचा लचका तोडला आहे. मुलाच्या डोक्याच्या मागील बाजूस 8 ते 10 खोल चाव्याच्या (Dog Bite Marks) खुणा आहेत, तसेच त्याचे दात तुटले असून चेहऱ्यावरही गंभीर जखमा झाल्या आहेत. सुदैवाने, गल्लीतील दोघांनी कुत्र्याला दूर खेचल्यामुळे मुलाला वाचवण्यात यश आले आणि तो शुद्धीवर आहे.
शेजाऱ्यांच्या मदतीने पालकांनी पीडित मुलाची पिटबुलच्या तावडीतून सुटका केली. सुरुवातीला त्याला रोहिणी येथील बीएसए रुग्णालयात दाखल केले होते, पण नंतर त्याला सफदरजंग रुग्णालयात (Safdarjung Hospital) हलवण्यात आले, जिथे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल
प्राथमिक चौकशीत असे आढळले आहे की, हा पिटबुल कुत्रा पीडित मुलाचे शेजारी राजेश पाल यांचा आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी राजेश पाल यांचा मुलगा सचिन पाल, जो सध्या हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे, त्याने हा पिट बुल डॉग घरी आणला होता. पोलिसांनी मुलाचे वैद्यकीय रेकॉर्ड गोळा केले आहेत. तसेच, मुलाच्या वडिलांचा जबाब नोंदवला आहे. मुलाचे वडील दिनेश कीर्ती नगरमधील एका खाजगी कारखान्यात काम करतात. तक्रार आणि वैद्यकीय निष्कर्षांच्या आधारे, प्रेम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – Gorakhpur Shocker: घोर कलियुग! 'आईचा मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवा…', वृध्दाश्रमला मुलाचं धक्कादायक उत्तर