LPG Gas Scam: सावधान! गॅस टंचाईचा फायदा घेत सायबर भामट्यांचा डल्ला; ‘या’ एका चुकीमुळे रिकामे होऊ शकते बँक खाते

गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना 'घरपोच सेवा' आणि 'त्वरित डिलिव्हरी'चे आमिष दाखवून गंडा घातला जात आहे.

LPG Gas Scam: सावधान! गॅस टंचाईचा फायदा घेत सायबर भामट्यांचा डल्ला; ‘या’ एका चुकीमुळे रिकामे होऊ शकते बँक खाते

LPG Gas Scam:  मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा फायदा आता सायबर गुन्हेगार घेऊ लागले आहेत. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना 'घरपोच सेवा' आणि 'त्वरित डिलिव्हरी'चे आमिष दाखवून गंडा घातला जात आहे. या नवीन प्रकारच्या 'एलपीजी स्कॅम'मुळे सर्वसामान्यांचे बँक खाते रिकामे होण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

'पे नाऊ, गेट गॅस'च्या जाळ्यात अडकू नका
सायबर गुन्हेगार सध्या WhatsApp, SMS आणि सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांना जाळ्यात ओढत आहेत. "आता पैसे भरा आणि उद्या गॅस मिळवा" (Pay Now, Get Gas Tomorrow) अशा आकर्षक घोषणांचे संदेश पाठवले जात आहेत. गॅस एजन्सीबाहेरील गर्दी टाळण्यासाठी अनेक नागरिक या संदेशांमधील लिंकवर क्लिक करतात. ज्या क्षणी तुम्ही या बनावट लिंकवर पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करता, त्याच क्षणी तुमच्या खात्यातील रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खिशात जाते.

बनावट जाहिराती आणि अधिकृत लोगोचा गैरवापर
इण्डेन (Indane), भारत गॅस (Bharat Gas) आणि एचपी गॅस (HP Gas) यांसारख्या नामांकित कंपन्यांचे अधिकृत लोगो वापरून सोशल मीडियावर बनावट जाहिराती चालवल्या जात आहेत. या जाहिराती इतक्या हुबेहूब असतात की, नागरिक आपली वैयक्तिक बँकिंग माहिती सहज शेअर करतात. लक्षात ठेवा, अधिकृत गॅस कंपन्या कधीही बुकिंगच्या वेळी आगाऊ रक्कमेची सक्ती करत नाहीत किंवा अशा प्रकारच्या संशयास्पद लिंक्स पाठवत नाहीत.

हेही वाचा – Vasai Fish Viral Video : वसईकरांनो, मासे खाताय तर सावधान..! मासळीवर चक्क लाल हिटची फवारणी

फसवणूक टाळण्यासाठी 'या' 5 नियमांचे पालन करा

अधिकृत मार्गच वापरा: गॅस बुकिंगसाठी केवळ कंपनीची अधिकृत वेबसाइट किंवा नोंदणीकृत एसएमएस सेवेचाच वापर करा.
आगाऊ रक्कम देऊ नका: सिलेंडर हातात मिळण्यापूर्वी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा लिंकद्वारे पैसे देऊ नका.
ओटीपी शेअर करू नका: तुमचा युपीआय पिन (UPI PIN) किंवा ओटीपी (OTP) कधीही कोणालाही सांगू नका.
अनोळखी लिंक टाळा: "त्वरित डिलिव्हरी" देण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
त्वरित तक्रार करा: जर तुमची फसवणूक झाली, तर वेळ न घालवता 1930 या सायबर क्राईम हेल्पलाइनवर संपर्क साधा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number