Noida School Bomb Threat : नोएडात पुन्हा ‘बॉम्ब’ची दहशत; परीक्षेदरम्यान 12 शाळांना धमकीचे ईमेल, विद्यार्थ्यांमध्ये खळबळ

या धमकीमुळे शाळा प्रशासन, विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून शाळा तातडीने रिकाम्या करण्यात आल्या आहेत. <br/>

Noida School Bomb Threat : नोएडात पुन्हा ‘बॉम्ब’ची दहशत; परीक्षेदरम्यान 12  शाळांना धमकीचे ईमेल, विद्यार्थ्यांमध्ये खळबळ

Noida School Bomb Threat :  नोएडामधील नामांकित शाळांमध्ये सुरू असलेल्या सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षांना आज बॉम्बच्या धमकीचे गालबोट लागले. शहरातील जवळपास 12 हून अधिक शाळांना अधिकृत ईमेलद्वारे कॅम्पसमध्ये स्फोटके असल्याचा इशारा देण्यात आला. या धमकीमुळे शाळा प्रशासन, विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून शाळा तातडीने रिकाम्या करण्यात आल्या आहेत. 

बोर्ड परीक्षेच्या वेळीच धमकी; स्निफर डॉग्सकडून तपासणी
ज्या वेळी हे धमकीचे ईमेल प्राप्त झाले, तेव्हा शाळांमध्ये 10 वी आणि 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होत्या. ईमेलमध्ये शाळेत बॉम्ब असल्याचा दावा करण्यात आल्याने परीक्षा हॉलमधून विद्यार्थ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. नोएडा पोलिसांच्या पथकासह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) तसेच स्निफर डॉग युनिट्सनी तातडीने शाळांमध्ये धाव घेतली. संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली जात असून, अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. त्यामुळे ही धमकी खोटी (Hoax) असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मागील घटनांशी धागेदोरे; सहा जणांना यापूर्वीच अटक
नोएडामध्ये अशा प्रकारे शाळांना धमकावण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात, 23 जानेवारी रोजी देखील सुमारे 20 शाळांना अशाच पद्धतीचे ईमेल आले होते. त्या प्रकरणात उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने (STF) तपास करून सहा आरोपींना अटक केली होती. धक्कादायक म्हणजे, हे आरोपी ऑनलाइन बेटिंग रॅकेट चालवत होते आणि त्यांनी अमेरिकेच्या सर्व्हरचा वापर करून ग्रेटर नोएडामधून हे ईमेल पाठवले होते.

हेही वाचा – Dhule : भयंकर! स्मशानातील सोनं चोरीला, अंत्यविधीनंतरची राखही राहिली नाही शिल्लक; धुळ्यात चाललंय काय?

परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत अनिश्चितता
धमकीनंतर परीक्षा हॉल रिकामे करण्यात आल्याने आजच्या पेपरवर त्याचा परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव परीक्षा काही काळासाठी थांबवण्यात आल्या, मात्र परीक्षा कायमस्वरूपी रद्द झाल्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सायबर पोलीस आता या ईमेलचा आयपी (IP) ॲड्रेस शोधून काढण्याचे काम करत आहेत, जेणेकरून यामागच्या सूत्रधारापर्यंत पोहोचता येईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number