Theft at Giribala Singh House: मोठी बातमी! ट्विशा शर्मा प्रकरणातील आरोपी माजी न्यायाधीश गिरीबाला यांच्या घरी चोरी

ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी आणि निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंह यांच्या निवासस्थानी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाली आहे.

Theft at Giribala Singh House: मोठी बातमी! ट्विशा शर्मा प्रकरणातील आरोपी माजी न्यायाधीश गिरीबाला यांच्या घरी चोरी

Theft at Giribala Singh House: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. बहुचर्चित ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी आणि निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंह यांच्या निवासस्थानी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून हाय-प्रोफाईल प्रकरणाशी संबंधित घर असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, पहाटे सुमारे 2:00 वाजता 3 मुखवटाधारी चोरांनी घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने आणि काही महत्त्वाची कागदपत्रे लंपास करण्याचा प्रयत्न केला.

पहिल्या मजल्यावरून चोरांचा प्रवेश
एसीपी (ACP) रजनीश कश्यप यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, माजी न्यायाधीश गिरीबाला सिंह आणि त्यांचा धाकटा मुलगा समर्थ सिंह हे सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे घरात केवळ त्यांचा मोठा मुलगा हजर होता. मध्यरात्रीच्या सुमारास 3 अज्ञात मुखवटाधारी चोर पहिल्या मजल्यावरील दरवाजा वाकवून घरात शिरले. रात्री घरचे सर्वजण झोपलेले असताना चोरांनी कपाटांमधील सामान अस्ताव्यस्त करून मौल्यवान वस्तू शोधल्या. सकाळी उठल्यावर घर अस्ताव्यस्त दिसल्याने या चोरीचा खुलासा झाला आणि कुटुंबाने तातडीने पोलिसांत धाव घेतली.

गस्तीवर असलेल्या चार्ली पथकाची तत्परता 
दरम्यान, चोरी करून पळ काढत असतानाच परिसरात गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या 'चार्ली' वाहनावरील कर्मचाऱ्यांना 3 संशयास्पद व्यक्ती आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, चोरांनी थेट पोलिसांशीच झटापट सुरू केली. मात्र, पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यामुळे चोर घाबरले आणि चांदीच्या वाट्या तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे असलेली पिशवी घटनास्थळावरच टाकून अंधाराचा फायदा घेत फरार झाले.

हेही वाचा – Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; पती समर्थ अन् सासू गिरीबाला सिंग यांना 14 दिवसांची कोठडी

FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध मोहीम
गिरीबाला सिंह यांच्या मोठ्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. घरातून नेमके काय काय चोरीला गेले आहे, याचा अंदाज अद्याप कुटुंबाला आलेला नाही. त्यामुळे पोलीस चोरीच्या एकूण नुकसानीचे मूल्यांकन करत आहेत. तसेच जप्त करण्यात आलेली कागदपत्रे आणि चांदीच्या वस्तू गिरीबाला यांच्याच घरातील आहेत का, याची पडताळणी सुरू आहे. गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील आणि घरातील CCTV फुटेज तपासले जात असून, त्या 3 संशयितांना लवकरच अटक केली जाईल, अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number