New BEE Star Rating Rules: BEE स्टार रेटिंगचे नियम आता अधिक कडक; 1 ते 5 स्टारचा नेमका अर्थ काय? UPPCL ने सांगितलं वीज बचतीसाठी सोपं गणित

1 जानेवारी 2026 पासून, ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE) ने उपकरणांच्या स्टार रेटिंगचे नियम अधिक कडक केले आहेत.

New BEE Star Rating Rules: BEE स्टार रेटिंगचे नियम आता अधिक कडक; 1 ते 5 स्टारचा नेमका अर्थ काय? UPPCL ने सांगितलं वीज बचतीसाठी सोपं गणित

New BEE Star Rating Rules: अनेकदा इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करताना आपण सवलतींच्या (Discount) मागे लागतो आणि ‘स्टार रेटिंग’कडे दुर्लक्ष करतो. मात्र, ही चूक तुमच्या खिशाला मोठी कात्री लावू शकते. 1 जानेवारी 2026 पासून, ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE) ने उपकरणांच्या स्टार रेटिंगचे नियम अधिक कडक केले आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (UPPCL) सोशल मीडियाद्वारे 1 ते 5 स्टार रेटिंगचे नेमके गणित मांडले असून, ग्राहकांना वीज बचतीचा गुरुमंत्र दिला आहे.

उच्च स्टार रेटिंग म्हणजे केवळ वीज बचत नव्हे
UPPCL च्या मते, उच्च स्टार रेटिंगचा अर्थ केवळ विजेची बचत असा होत नाही, तर ते उपकरण आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याचेही लक्षण आहे. जरी अशी उपकरणे खरेदी करताना महाग वाटत असली, तरी दीर्घकाळात विजेच्या बिलात होणारी बचत ही तुमची अतिरिक्त गुंतवणूक वसूल करून देते. 

 रेटिंगनुसार उपकरणांचे वर्गीकरण

1-स्टार: स्वस्त पण भविष्यासाठी खर्चिक
1-स्टार रेटिंग असलेली उपकरणे खरेदी करताना स्वस्त असतात, पण त्यांची वीज वाचवण्याची क्षमता सर्वात कमी असते. परिणामी, दरमहा येणारे विजेचे बिल जास्त असते. ही उपकरणे फक्त अशाच ठिकाणी वापरावीत जिथे त्यांचा वापर अत्यंत कमी आहे.

2 आणि 3-स्टार: मध्यम मार्ग
3-स्टार मानांकन हे “प्रमाणित ऊर्जा कार्यक्षमता” दर्शवते. ही उपकरणे विजेचा वापर आणि कामाची पद्धत यात समतोल राखतात. सामान्य कुटुंबासाठी ही उपकरणे एक मध्यम मार्ग ठरू शकतात, परंतु यात बचतीला मर्यादा असतात.

4-स्टार: स्मार्ट गुंतवणूक
ही उपकरणे ‘उच्च ऊर्जा कार्यक्षमता’ श्रेणीत येतात. यामध्ये अशा तंत्रज्ञानाचा वापर केला जातो जे कमी वीज वापरून सर्वोत्तम रिझल्ट देते. एअर कंडिशनर (AC) किंवा गिझर यांसारख्या उपकरणांसाठी 4-स्टार रेटिंग उत्तम मानले जाते.

हेही वाचा – Mobile Network Company Rules: जिओ, एअरटेल ग्राहकांनो आता तक्रार निवारण होणार सुपरफास्ट; TRAI चा मोठा प्लॅन तयार

5-स्टार: सर्वोच्च बचत आणि तंत्रज्ञान
5-स्टार रेटिंग हे कार्यक्षमतेचे सर्वोच्च शिखर आहे. UPPCL च्या मते, ही उपकरणे विजेचा वापर सर्वात कमी करतात. विशेषतः रेफ्रिजरेटर आणि एसी यांसारखी उपकरणे जी 24 तास किंवा दिवसातील बराच वेळ सुरू असतात, ती 5-स्टार असणेच हिताचे आहे. यामुळे विजेच्या बिलावर पडणारा आर्थिक बोजा लक्षणीयरीत्या कमी होतो. 1 जानेवारी 2026 पासूनचे नवीन नियम ग्राहकांना अधिक पारदर्शक माहिती देणार आहेत. त्यामुळे नवीन उपकरण खरेदी करताना केवळ किंमत न पाहता, त्यावरील ‘BEE लेबल’ तपासून भविष्यातील आर्थिक नुकसान टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number