Online Shopping Scam: iPhone ऐवजी पार्सलमध्ये निघालं दाढीचं तेल; मुंबई ग्राहक मंचाने फ्लिपकार्ट व विक्रेत्याला ठोठावला 1.81 लाखांचा दंड

महागडा स्मार्टफोन मागवूनही त्याऐवजी वेगळेच साहित्य मिळाल्याने आणि त्यानंतर तक्रारीची दखल न घेतल्याबद्दल आयोगाने कंपनीला व्याजासह एकूण 1.81 लाख रुपयांहून अधिक भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.<br/>

Online Shopping Scam: iPhone ऐवजी पार्सलमध्ये निघालं दाढीचं तेल; मुंबई ग्राहक मंचाने फ्लिपकार्ट व विक्रेत्याला ठोठावला 1.81 लाखांचा दंड

Online Shopping Scam:  ऑनलाईन शॉपिंग करताना ग्राहकाची फसवणूक करणे आणि तक्रारीकडे दुर्लक्ष करणे ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला चांगलेच महागात पडले आहे. मुंबई (उपनगर) जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अतिरिक्त खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण प्रकरणात फ्लिपकार्ट आणि संबंधित विक्रेत्याला संयुक्तपणे दोषी ठरवत ग्राहकाच्या बाजूने निर्णय दिला आहे. महागडा स्मार्टफोन मागवूनही त्याऐवजी वेगळेच साहित्य मिळाल्याने आणि त्यानंतर तक्रारीची दखल न घेतल्याबद्दल आयोगाने कंपनीला व्याजासह एकूण 1.81 लाख रुपयांहून अधिक भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

आयफोनऐवजी मिळाली दाढीच्या तेलाची बाटली

मुंबईतील पवई परिसरात राहणाऱ्या एका ग्राहकाने 22 एप्रिल 2023 रोजी फ्लिपकार्ट ॲपवरून No-Cost EMI पर्यायाचा वापर करून Apple iPhone 14 Pro (128 GB) हा 1,11,793 रुपये किमतीचा स्मार्टफोन ऑर्डर केला होता. मोबाईल कव्हर आणि चार्जर वेळेवर मिळाले. मात्र, मुख्य मोबाईलचे पार्सल उघडताच आयफोनऐवजी त्यामध्ये Beard Oil ची बाटली आणि पॅकिंगचे साहित्य असल्याचे पाहून ग्राहकाला मोठा धक्का बसला.

तक्रार करूनही फ्लिपकार्टकडून दाद नाही

ही चूक लक्षात आल्यानंतर ग्राहकाने एप्रलि आणि मे 2023 दरम्यान फ्लिपकार्टच्या कस्टमर केअरशी अनेकदा संपर्क साधून सर्व पुरावे सादर केले. मात्र, समस्या सोडवण्याऐवजी कंपनीने तक्रार वारंवार 'Closed' दाखवत प्रकरण निकाली काढल्याचा दावा केला. ग्राहकाला ना नवीन आयफोन मिळाला, ना भरलेली रक्कम परत करण्यात आली. अखेर न्याय मिळावा म्हणून ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली.

ई-कॉमर्स कंपनी जबाबदारी टाळू शकत नाही : आयोग

या प्रकरणावर सुनावणी करताना आयोगाने स्पष्ट केले की, ग्राहकाने पूर्ण पैसे भरल्यानंतर योग्य उत्पादन पोहोचवण्याची जबाबदारी ई-कॉमर्स कंपनीचीच असते. विक्री झाल्यानंतर जबाबदारी झटकता येणार नाही, असे स्पष्ट करत आयोगाने तक्रारीची योग्य चौकशी न करणे, चुकीचे पार्सल परत न घेणे आणि कोणताही तोडगा न काढता तक्रार बंद करणे ही अयोग्य व्यापार पद्धती तसेच सेवेतील गंभीर त्रुटी असल्याचे नमूद केले. त्यामुळे फ्लिपकार्ट आणि International Value Retail Private Limited या विक्रेत्याला संयुक्तपणे दोषी ठरवण्यात आले.

हेही वाचा – Sachin Ahir : धक्कादायक! सचिन अहिर यांच्या घरावर 2.65 कोटींचा डल्ला; धक्कादायक खुलास्याने पोलिसही चक्रावले

45 दिवसांत भरपाई देण्याचे आदेश

ग्राहकाला दिलासा देताना आयोगाने फ्लिपकार्ट आणि संबंधित विक्रेत्याला 1,11,793 रुपये ही मूळ रक्कम 22 एप्रिल 2023 पासून प्रत्यक्ष परतफेड होईपर्यंत 9 टक्के वार्षिक व्याजासह देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय मानसिक त्रासाबद्दल 50,000 रुपये आणि न्यायालयीन खर्चापोटी 20,000 रुपये देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ही संपूर्ण रक्कम 45 दिवसांच्या आत ग्राहकाला अदा करणे बंधनकारक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number