Akshaya Tritiya 2026 Gold Purchase Time : हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ आणि मंगलमयी मानला जातो. वैशाख शुद्ध तृतीया तिथीला साजरा होणारा हा सण आर्थिक प्रगती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. यंदा अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने, चांदी आणि नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी तब्बल 19 तासांहून अधिक कालावधीचा शुभ मुहूर्त भाविकांना मिळणार आहे. अक्षय तृतीयेला असेही म्हणतात आणि या दिवशी केलेल्या दानाचे व खरेदीचे फळ कधीही क्षय पावत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
अक्षय तृतीया तिथी आणि शुभ मुहूर्त
यंदा अक्षय तृतीया 19 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार, तृतीया तिथी 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 वाजता सुरू होईल आणि 20 एप्रिल रोजी सकाळी 07:49 वाजेपर्यंत राहील. विशेष म्हणजे, अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवस हा 'स्वयंसिद्ध मुहूर्त' मानला जातो. याला हिंदी भाषेत 'अबूझ मुहूर्त' असेही म्हणतात. याचा अर्थ असा की, या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. तरीही, दिवसातील सर्वात शुभ असलेला 'अभिजीत मुहूर्त' दुपारी 11:55 ते 12:46 या वेळेत असेल.
सोने खरेदीसाठी सुवर्ण संधी
सोने, चांदी, दागिने किंवा नवीन वाहन आणि वास्तू खरेदी करण्यासाठी 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 वाजल्यापासून मुहूर्त सुरू होत आहे. हा शुभ काळ दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 एप्रिलच्या सकाळपर्यंत सुरू राहणार असल्याने ग्राहकांना खरेदीसाठी मोठा अवधी मिळणार आहे.
दिवसाचा शुभ चौघडिया मुहूर्त
खरेदी आणि पूजेसाठी दिवसातील सर्वोत्तम वेळा खालीलप्रमाणे आहेत:
लाभ (उन्नती मुहूर्त): सकाळी 09:06 ते 10:43 पर्यंत
अमृत (सर्वोत्तम मुहूर्त): सकाळी 10:43 ते दुपारी 12:20 पर्यंत
शुभ (उत्तम मुहूर्त): दुपारी 01:58 ते दुपारी 03:35 पर्यंत
चर (सामान्य मुहूर्त): सकाळी 07:29 ते 09:06 पर्यंत
रात्रीचा शुभ चौघडिया मुहूर्त
ज्यांना सायंकाळी किंवा रात्री खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी मुहूर्त खालीलप्रमाणे असतील:
शुभ (उत्तम मुहूर्त): सायंकाळी 06:49 ते रात्री 08:12 पर्यंत
अमृत (सर्वोत्तम मुहूर्त): रात्री 08:12 ते रात्री 09:35 पर्यंत
चर (सामान्य मुहूर्त): रात्री 09:35 ते रात्री 10:57 पर्यंत
लाभ (उन्नती मुहूर्त): मध्यरात्री 01:43 ते पहाटे 03:05 पर्यंत (20 एप्रिल)
शुभ (उत्तम मुहूर्त): 20 एप्रिल रोजी पहाटे 04:28 ते सकाळी 05:51 पर्यंत
हेही वाचा – Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीऐवजी खरेदी करा 'या' 4 वस्तू; घरात नांदेल सुख-समृद्धी
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)