Security Guard Assault : हादरवणारी घटना! शिक्षणासाठी PG म्हणून राहणाऱ्या तरुणीवर सोसायटीच्या सुरक्षारक्षकाचा अत्याचार

आरोपी गेल्या 4 वर्षांपासून विविध सुरक्षा एजन्सींमध्ये काम करत होता आणि संबंधित सोसायटीत त्याला अवघ्या 6 दिवसांपूर्वीच तैनात करण्यात आले होते.

Security Guard Assault : हादरवणारी घटना! शिक्षणासाठी PG म्हणून राहणाऱ्या तरुणीवर सोसायटीच्या सुरक्षारक्षकाचा अत्याचार

Security Guard PG Girl Rape Case: गुजरातच्या अहमदाबाद शहरातील जोधपूर परिसरातील एका सोसायटीत एक अत्यंत धक्कादायक आणि भयानक घटना उघडकीस आली आहे. इंटिरियर डिझायनिंगचे शिक्षण घेणारी 22 वर्षीय विद्यार्थिनी सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये पेइंग गेस्ट (PG) म्हणून गेल्या 2 वर्षांपासून राहत होती. शनिवारी रात्री उशिरा ही तरुणी नेहमीप्रमाणे शतपावली करण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेली होती. त्यावेळी तिथे आलेल्या सुरक्षारक्षकाने तिच्याकडे अयोग्य मागणी केली. तरुणीने त्याला विरोध दर्शवला असता, नराधमाने तिच्यावर प्राणघातक हल्ला चढवला आणि तिच्या गळ्यात वायर घट्ट आवळून तिला ओरडण्यापासून रोखले.

तासभर चालला अत्याचार; मोबाईल हिसकावून आरोपी फरार
आरोपीने तरुणीला पूर्णपणे नियंत्रणात आणून तब्बल तासभर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. गळ्यात वायर आवळल्यामुळे तरुणीला मदतीसाठी ओरडणेही कठीण झाले होते. अत्याचार केल्यानंतर नराधमाने तरुणीचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तिला टेरेसवरच बाहेरून कुलूप लावून पळ काढला. आरोपी निघून गेल्यानंतर पीडित तरुणीने अत्यंत धैर्याने मदतीसाठी आरडाओरड केली. यानंतर खालील मजल्यांवर राहणाऱ्या रहिवाशांनी वर धाव घेऊन तिची सुटका केली. तात्काळ तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ती गंभीर मानसिक धक्क्यामध्ये आहे.

हेही वाचा – Baramati Crime : गुंगीचे औषध दिले…सिमेंटच्या थडग्यात कोंडलं…डायल 112 मुळे वाचला पीडित पतीचा जीव; पत्नीने रचलेला कट पोलिसांनी उधळला

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या (CCTV) मदतीने आरोपीला ठोकल्या बेड्या
घटनेची माहिती मिळताच आनंदनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सेक्टर 1 चे जेसीपी नीरज बडगुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनेच्या वेळी आरोपी लिफ्टने टेरेसवर जाताना स्पष्ट दिसून आला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून रविवारी भल्या पहाटे हेबतपूर भागातून आरोपी सुरक्षारक्षक धर्म सिंग (वय 27) याला बेड्या ठोकल्या. आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशातील हर्दोई जिल्ह्याचा रहिवासी आहे.

अवघ्या 6 दिवसांपूर्वीच झाली होती नियुक्ती; सिक्युरिटी एजन्सीची होणार चौकशी
डीसीपी झोन-7 चे शिवम वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धर्म सिंग गेल्या 4 वर्षांपासून विविध सुरक्षा एजन्सींमध्ये काम करत होता आणि संबंधित सोसायटीत त्याला अवघ्या 6 दिवसांपूर्वीच तैनात करण्यात आले होते. पीडित तरुणीच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल आरोपीला आधीपासून माहिती होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. याशिवाय, सुरक्षा रक्षकाची कोणतीही योग्य पार्श्वभूमी तपासणी न करता त्याची नियुक्ती केल्याप्रकरणी संबंधित सिक्युरिटी एजन्सीचीही कसून चौकशी केली जाणार आहे.

हेही वाचा – Cyber Crime : आधी अर्थमंत्री नंतर टाटा…, सायबर गुन्हेगारांचा नवा डाव उघड! डीपफेक व्हिडीओ तयार करून महिलेचे लाखो रुपये लाटले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number