Crime News : चालत्या व्हॅनमध्ये तरुणीवर 2 तास सामूहिक अत्याचार; प्रतिकार केल्याने नराधमांनी धावत्या गाडीतून फेकलं

आईशी भांडण होऊन घराबाहेर पडलेल्या एका 25 वर्षीय तरुणीवर चालत्या इको व्हॅनमध्ये सामूहिक अत्याचार करण्यात आला.

Crime News : चालत्या व्हॅनमध्ये तरुणीवर 2 तास सामूहिक अत्याचार; प्रतिकार केल्याने नराधमांनी धावत्या गाडीतून फेकलं

Faridabad Shocker : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हरियाणातील फरिदाबादमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आईशी भांडण होऊन घराबाहेर पडलेल्या एका 25 वर्षीय तरुणीवर चालत्या इको व्हॅनमध्ये सामूहिक अत्याचार करण्यात आला. नराधमांनी पीडितेला तब्बल दोन तास शहरात फिरवले आणि त्यानंतर पहाटे 3:00 च्या सुमारास धावत्या गाडीतून बाहेर फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन आरोपींना अटक केली आहे.

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचा रात्री तिच्या आईशी वाद झाला होता, त्यानंतर ती आपल्या मैत्रिणीकडे जाण्यासाठी घराबाहेर पडली. रात्री 12:00 च्या सुमारास वाहनाची वाट पाहत असताना तिने एका इको व्हॅनकडे लिफ्ट मागितली. व्हॅनमध्ये आधीच दोन तरुण होते. लिफ्ट दिल्यानंतर आरोपींनी गाडी फरिदाबाद-गुरुग्राम रोडच्या दिशेने नेली आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. एकाने गाडी चालवली तर दुसऱ्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

हेही वाचा – Biocon Employees Case: कॉर्पोरेट विश्वात हळहळ; 26 वर्षांच्या तरुणाचा टोकाचा निर्णय, बेंगळुरूतील Biocon कार्यालयात काय घडलं?

तरुणीची प्रकृती गंभीर, 12 टाके पडले

पीडितेने नराधमांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला एसजीएम नगरजवळ चालत्या गाडीतून खाली फेकण्यात आले. या अपघातात तिच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिला 12 टाके पडले आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या चेहऱ्याचे हाड आणि खांदा तुटला असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. रस्त्यावरील कठीण वस्तूवर किंवा दगडावर आदळल्यामुळे या जखमा झाल्याचे दिसून येत आहे. सध्या पीडितेवर फरिदाबादमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

हेही वाचा – Crime News: आई पोलीस तरीही मुलगी असुरक्षित; बापाच्या अमानवीय कृत्याने माणुसकीला काळिमा

आरोपींना अटक आणि राजकीय पडसाद

पोलीस प्रवक्ते यशपाल सिंह यांनी सांगितले की, सीसीटीव्हीच्या मदतीने दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हे दोन्ही आरोपी मूळचे मध्य प्रदेशचे असून ते फरिदाबादमध्ये वास्तव्यास होते. या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापले आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुडा यांनी या घटनेचा निषेध करत राज्य सरकारवर टीका केली आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या या घटनेने राज्याची मान शरमेने खाली गेली आहे. सरकार गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरत असून पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, असे हुडा यांनी म्हटले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number