ECINET Portal: मतदारांसाठी ‘वन स्टॉप सोल्यूशन’! निवडणूक आयोगाचे ECINET पोर्टल लाँच; ओळखपत्रापासून तक्रारीपर्यंत सर्व सेवा एकाच क्लिकवर

ECINET हे पोर्टल मतदारांची सोय वाढवण्यासाठी तयार करण्यात आले असून, याद्वारे नागरिक मतदान आणि मतदार व्यवस्थापनाशी संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळवू शकतील.

ECINET Portal: मतदारांसाठी ‘वन स्टॉप सोल्यूशन’! निवडणूक आयोगाचे ECINET पोर्टल लाँच; ओळखपत्रापासून तक्रारीपर्यंत सर्व सेवा एकाच क्लिकवर

ECINET Portal: चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून निवडणूक आयोगाने रविवारी अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होईल, तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत (23 एप्रिल आणि 29 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडेल. या सर्व विधानसभा निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी जाहीर होतील. यासोबतच गोवा, कर्नाटक, नागालँड, त्रिपुरा (9 एप्रिल) आणि गुजरात, महाराष्ट्र (23 एप्रिल) येथील विधानसभेच्या 8 जागांसाठी पोटनिवडणुका पार पडणार आहेत.

काय आहे 'ECINET' व्यासपीठ?
निवडणुकांच्या या धामधुमीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी 'ECINET' या एकीकृत व्यासपीठावर विशेष प्रकाश टाकला आहे. हे पोर्टल मतदारांची सोय वाढवण्यासाठी तयार करण्यात आले असून, याद्वारे नागरिक मतदान आणि मतदार व्यवस्थापनाशी संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळवू शकतील. या एकाच प्लॅटफॉर्ममुळे मतदारांना वेगवेगळ्या कार्यालयांत किंवा संकेतस्थळांवर फिरण्याची गरज उरणार नाही.

मतदारांसाठी उपलब्ध असलेल्या प्रमुख सेवा
'ECINET' च्या माध्यमातून नागरिक नवीन मतदार नोंदणी करू शकतात आणि आपल्या मतदार ओळखपत्राशी संबंधित तक्रारींचे निवारणही करू शकतात. याशिवाय, e-EPIC (ई-मतदार ओळखपत्र) डाउनलोड करणे, आपल्या BLO शी संपर्क साधणे, मतदार यादीत नाव शोधणे आणि अर्जाची स्थिती तपासणे यांसारख्या सेवा येथे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, दिव्यांग व्यक्तींसाठी या पोर्टलवर विशेष सोयी करण्यात आल्या आहेत.

उमेदवारांची माहिती आणि तक्रार निवारण
केवळ वैयक्तिक सेवाच नव्हे, तर आपल्या मतदारसंघातील उमेदवारांची माहिती मिळवण्यासाठीही हे पोर्टल अत्यंत उपयुक्त आहे. निवडणुकांदरम्यान कोणतीही अनियमितता किंवा गैरप्रकार आढळल्यास नागरिक या पोर्टलद्वारे थेट तक्रार नोंदवू शकतात. तसेच, विविध ठिकाणच्या मतदानाची टक्केवारी, ऐतिहासिक आकडेवारी आणि निवडणुकांशी संबंधित सर्व अद्ययावत माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा – Assembly Election 2026: 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं; निवडणूक आयोगाकडून तारखांची घोषणा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

ECINET कसे वापरावे?
नागरिक ECINET पोर्टलचा लाभ संकेतस्थळाद्वारे (website) किंवा मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे घेऊ शकतात. स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी हे ॲप Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध आहे. संगणक वापरकर्ते थेट अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या सर्व वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकतात.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number