Syria Mosque Blast : सीरियात मशिदीत नमाज पठणावेळी भीषण स्फोट; 8 जणांचा जागीच मृत्यू, 18 जखमी

या भीषण हल्ल्यात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 18 पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

Syria Mosque Blast : सीरियात मशिदीत नमाज पठणावेळी भीषण स्फोट; 8 जणांचा जागीच मृत्यू, 18 जखमी

Syria Mosque Blast : सीरियातील होम्स शहरात एका मशिदीत शुक्रवारी नमाज सुरू असताना शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. या भीषण हल्ल्यात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 18 पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. बहुसंख्य अलावाइट पंथाच्या वस्तीत असलेल्या या मशिदीला लक्ष्य करून हा कट रचण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मशिदीत झाला भीषण स्फोट

सीरियाची सरकारी वृत्तसंस्था 'SANA' ने दिलेल्या माहितीनुसार, होम्समधील वादी अल-दहाब परिसरातील 'इमाम अली बिन अबी तालिब' मशिदीत हा स्फोट झाला. सीरियाच्या गृह मंत्रालयाने या घटनेचे वर्णन 'दहशतवादी हल्ला' असे केले आहे. ज्यावेळी मशिदीत भाविकांची मोठी गर्दी होती, त्याच वेळी हा स्फोट घडवून आणण्यात आला. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा – Donald Trump On epstein Files : एपस्टीन प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांचे वादग्रस्त फोटो समोर, अखेर सोडलं मौन, म्हणाले, ''मी त्याला आधीच..'

अल्पसंख्याक समुदाय निशाण्यावर

हा हल्ला ज्या मशिदीत झाला, ती अलावाइट इस्लाम पंथाशी संबंधित आहे. सीरियाचे माजी अध्यक्ष बशर अल-असद हे देखील याच पंथाचे होते. गेल्या वर्षी अध्यक्ष अहमद अल-शरा यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर सैन्याने दमास्कसवर कब्जा मिळवला होता, ज्यानंतर असद यांना रशियात शरण जावे लागले होते. तेव्हापासून अलावाइट समुदायावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.

'आयएस' (IS) कडून अस्थिरतेचा प्रयत्न?

सीरियातील गृहयुद्ध 13 वर्षांपासून सुरू आहे. बशर अल-असद यांचे सरकार कोसळल्यानंतर इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेने देशात पुन्हा पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. अहमद अल-शरा यांच्या नवीन सरकारला अस्थिर करण्यासाठी आणि अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी 'आयएस'चे फुटलेले गट सातत्याने असे हल्ले करत असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा – Canada : छातीत असह्य वेदना, आठ तास ताटकळत ठेवलं! 'बाबा, आता मला वेदना सहन होत नाहीत' म्हणत लेकाने सोडले प्राण

सीरियातील सद्यस्थिती 

दरम्यान, 2011 पासून सुरू असलेल्या गृहयुद्धात आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. देशाची अर्धी लोकसंख्या बेघर झाली असून लाखो सीरियन नागरिक तुर्की आणि युरोपमध्ये निर्वासित म्हणून जीवन जगत आहेत. तथापी, नवीन सरकार सत्तेत आल्यानंतरही देशातील आयएस आणि इतर कट्टरपंथी गटांचे हल्ले थांबलेले नाहीत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number