DRDO Paid Internship 2026: संरक्षण क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! DRDO कडून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी पेड इंटर्नशिप जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

भारतीय सशस्त्र दलांसाठी रडार तंत्रज्ञानाचा विकास करणाऱ्या या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या थेट मार्गदर्शनाखाली संशोधन करण्याची आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

DRDO Paid Internship 2026: संरक्षण क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! DRDO कडून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी पेड इंटर्नशिप जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

DRDO Paid Internship 2026: देशातील सर्वोच्च संशोधन संस्था असलेल्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) मध्ये काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. डीआरडीओ अंतर्गत कार्यरत असलेल्या बंगळूर येथील 'इलेक्ट्रॉनिक्स अँड रडार डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट' (LRDE) या प्रमुख प्रयोगशाळेने कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी 6 महिन्यांच्या पेड इंटर्नशिप प्रोग्रामची घोषणा केली आहे. भारतीय सशस्त्र दलांसाठी रडार तंत्रज्ञानाचा विकास करणाऱ्या या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या थेट मार्गदर्शनाखाली संशोधन करण्याची आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

विविध शाखांनुसार 75जागांचा सविस्तर तपशील
या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एकूण 75 जागा भरल्या जाणार असून, वेगवेगळ्या अभियांत्रिकी शाखांनुसार त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे: 

EC (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा समकक्ष): 35 जागा
CS (कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग किंवा समकक्ष): 20 जागा
ME (मेकॅनिकल इंजिनिअरिंग, PRODUCTION इंजिनिअरिंग किंवा समकक्ष): 10 जागा
EE (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स): 08 जागा
CE (सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा समकक्ष): 02 जागा

एकूण उपलब्ध जागा: 75 जागा

कोण करू शकणार अर्ज? जाणून घ्या पात्रता निकष

या राष्ट्रीय पातळीवरील इंटर्नशिपसाठी केवळ भारतीय नागरिकत्व असलेले विद्यार्थीच पात्र ठरतील. यासाठीचे शैक्षणिक निकष खालीलप्रमाणे आहेत:

B.Tech / B.E : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीच्या तिसऱ्या वर्गामध्ये शिकत असलेले किंवा परीक्षा दिलेले विद्यार्थी, ज्यांना आतापर्यंत किमान 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण आहेत, ते अर्ज करू शकतात.

M.Tech / M.E / M.Sc : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या 1 ल्या किंवा दुसऱ्या सेमीस्टरमध्ये शिकणारे किंवा ते पूर्ण केलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. त्यांच्यासाठीही एकूण गुणांची टक्केवारी किमान 70 टक्के असणे बंधनकारक आहे.

इंटर्नशिपचे वेळापत्रक आणि मानधन (Stipend)

निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना दरमहा 5,000 रुपये स्टायपेंड दिला जाईल, जो 2 टप्प्यांत वितरित केला जाणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ : drdo.gov.in
अर्ज पोहोचवण्याची अंतिम तारीख : 1 जुलै 2026
निवडणूक यादी प्रसिद्ध होणे : 15 जुलै 2026
प्रशिक्षण कालावधी : 1 ऑगस्ट 2026 ते पुढील 6 महिने 

अर्जाची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

या भरतीसाठी उमेदवारांना वैयक्तिक पातळीवर थेट अर्ज करता येणार नाही, तर त्यांना आपल्या महाविद्यालयाच्या माध्यमातूनच अधिकृत प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

अर्जाचा नमुना डाऊनलोड करणे: डीआरडीओच्या संकेतस्थळावरून 'Format for Application for DRDO Paid Internship Scheme-2026' हा अर्जाचा नमुना डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी.

माहिती भरणे: अर्जावर विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, ओळख दस्तऐवज क्रमांक, कॉलेजचे नाव, शाखा, मिळालेले गुण (टक्केवारी) आणि इंटर्नशिप करण्यामागचे उद्दिष्ट या गोष्टी अचूकपणे नमूद कराव्यात.

महाविद्यालयाची कागदपत्रे जोडणे: कॉलेजच्या प्राचार्यांच्या स्वाक्षरीचे शिफारस पत्र, कॉलेजच्या लेटरहेडवर घेतलेले हमीपत्र आणि इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.

पत्ता आणि पाकीट: अर्जाच्या लिफाफ्यावर 'Paid Internship Application' आणि आपला 'Branch Code' स्पष्ट शब्दांत लिहून, हा अर्ज 'संचालक, इलेक्ट्रॉनिक्स अँड रडार डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (LRDE), सी. व्ही. रमण नगर, बंगळूर – 560093' या पत्त्यावर टपालाने पाठवावा.

हेही वाचा – Wrong EMI deduction rules : कर्ज फिटल्यावरही बँक EMI कापत असेल तर तातडीने 'हा' उपाय; अशाच प्रकरणात SBI ला झाला 1 लाखाचा दंड

अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेत रुजू होताना स्थानिक प्रशासनाकडून जारी केलेले पोलीस पडताळणी प्रमाणपत्र (Police Verification Certificate) सादर करणे बंधनकारक असेल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number