IND A vs SL A: ‘भारत-अ’ आणि ‘श्रीलंका-अ’ यांच्यातील हा अटीतटीचा सामना ‘सुपर ओव्हर’ (Super Over) पर्यंत पोहोचला होता. सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी धावांची गरज असताना वैभव सूर्यवंशीला धाव घेता आली नाही आणि भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयानंतर श्रीलंकेचा संघ जल्लोष करत असताना, त्यांचा खेळाडू विशन हलांबागे याने बाद झालेल्या वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे यांच्यावर काही आक्षेपार्ह टिप्पणी केली. या टोमण्यामुळे मैदानावरच दोन्ही बाजूंचे खेळाडू आमनेसामने आले.
हेही वाचा – FIH Women’s Nations Cup 2025-26: सलामीच्या सामन्यात भारताची जोरदार मुसंडी; अमेरिकेचा 3-2 ने पराभव
श्रीलंकन खेळाडूच्या धक्क्याला वैभवचे सडेतोड प्रत्युत्तर
शाब्दिक चकमक वाढल्यानंतर एका श्रीलंकन खेळाडूने 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला थेट धक्का दिला. मात्र, वय लहान असले तरी वैभवने अजिबात माघार घेतली नाही; त्यानेही तितक्याच आक्रमकतेने त्या खेळाडूला जशास तसे प्रत्युत्तर दिले. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून श्रीलंकेच्या इतर वरिष्ठ खेळाडूंनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. या घटनेनंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असतानाही वैभवचा राग अनावर झाला होता. त्याने श्रीलंकन खेळाडूंच्या दिशेने हातवारे करत आपला तीव्र संताप व्यक्त केला.
Another heated moment between Vaibhav Sooryvanshi and Sri Lankan players. ? https://t.co/iwmOQfMZwv pic.twitter.com/cUINMCFuJ5 — Qamar. (@Qamar5618) June 15, 2026
सामन्याचा धावता आढावा; फलंदाजीत वैभव अपयशी
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ‘भारत-अ’चा डाव 49.2 षटकांत 265 धावांवर आटोपला होता. सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही, त्याने 14 चेंडूंत 21 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघानेही निर्धारित षटकांत तंतोतंत 265 धावा केल्यामुळे सामना ‘सुपर ओव्हर’मध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने आधी फलंदाजी करत 16 धावा ठोकल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला केवळ 9 धावा करता आल्या आणि निसटत्या पराभवासह खेळाडूंमधील वादामुळे हा सामना अधिकच वादग्रस्त ठरला.