US Venezuela Gold Deal: व्हेनेझुएलाकडून अमेरिकेला होणार सोन्याचा पुरवठा; 650 किलो सोन्याच्या डीलमागील नेमकं ‘गुपित’ काय?

अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात सोन्याच्या व्यापारासंदर्भात महत्त्वाचा करार झाला असून व्हेनेझुएलाची सरकारी खाण कंपनी मिनर्वेन अमेरिकन बाजारासाठी 650 ते 1000 किलो सोन्याचा पुरवठा करणार आहे.

US Venezuela Gold Deal: व्हेनेझुएलाकडून अमेरिकेला होणार सोन्याचा पुरवठा; 650 किलो सोन्याच्या डीलमागील नेमकं ‘गुपित’ काय?

वॉशिंग्टन: जागतिक अर्थकारणात नव्या घडामोडी घडत असताना अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात सोन्याच्या व्यापारासंदर्भात एक महत्त्वाचा करार झाल्याची माहिती समोर आली आहे. या करारानुसार व्हेनेझुएलाची सरकारी खाण कंपनी मिनर्वेन अमेरिकन बाजारासाठी सोन्याचा पुरवठा करणार आहे. या व्यवहारामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्याला नवी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारातही या घडामोडीकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, या कराराअंतर्गत मिनर्वेन कंपनी सुमारे 650 किलो ते 1000 किलोपर्यंत सोन्याचे बार पुरवणार आहे. हा पुरवठा जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या कमोडिटी ट्रेडिंग कंपनी ट्रॅफिगुरा मार्फत केला जाणार आहे. ट्रॅफिगुरा ही कंपनी हे सोने अमेरिकन बाजारात पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडणार असून या व्यवहाराच्या बदल्यात व्हेनेझुएलाला अमेरिकन डॉलरमध्ये देयक मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

या करारामध्ये सोन्याच्या गुणवत्तेबाबतही स्पष्ट अट घालण्यात आली आहे. पुरवठा होणाऱ्या प्रत्येक गोल्ड बारमध्ये सुमारे 98 टक्के शुद्ध सोने असणे आवश्यक आहे. मिनर्वेनकडून सोने मिळाल्यानंतर ट्रॅफिगुरा ते अमेरिकेतील रिफायनऱ्यांपर्यंत पोहोचवेल. या प्रक्रियेसाठी अमेरिकन प्रशासनासोबत विशेष लॉजिस्टिक व्यवस्था करण्यात आल्याचेही वृत्त आहे.

हेही वाचा: Mumbai Metro : मेट्रोचं जाळं विस्तारणार! पूर्व-पश्चिमसह उत्तर-दक्षिण मुंबईदेखील जोडली जाणार, आता पाच नवी स्थानकं…

तज्ज्ञांच्या मते, हा करार केवळ सोन्याच्या व्यापारापुरता मर्यादित नसून दोन्ही देशांमधील वाढत्या आर्थिक सहकार्याचे द्योतक मानला जात आहे. विशेषतः नैसर्गिक संसाधनांच्या क्षेत्रात अमेरिका आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे काही विश्लेषकांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर वेनेजुएलाच्या खनिज संपत्तीवरील आंतरराष्ट्रीय स्वारस्य अधिक वाढू शकते.

व्हेनेझुएलासाठी हा करार आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. या व्यवहारातून मिळणारा निधी देशातील विकासकामांसाठी वापरला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दीर्घकाळ आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या व्हेनेझुएलासाठी हा करार काही प्रमाणात दिलासा देणारा ठरू शकतो.

दरम्यान, व्हेनेझुएलाच्या ऊर्जा क्षेत्रातही अमेरिकेचा प्रभाव वाढताना दिसत आहे. ट्रॅफिगुरा ही कंपनी व्हेनेझुएलामधील एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक मूल्याच्या तेल करारांशी जोडलेली असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे खनिज आणि ऊर्जा या दोन्ही क्षेत्रांमध्ये अमेरिका आणि वेनेजुएला यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत या सहकार्याचे स्वागत केले. त्यांनी दोन्ही देशांमधील व्यावसायिक समन्वयाबद्दल समाधान व्यक्त करत तेलाचा पुरवठा पुन्हा सुरू झाल्याचे नमूद केले. या घडामोडींमुळे अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील आर्थिक संबंध नव्या टप्प्यात प्रवेश करत असल्याची चर्चा जागतिक स्तरावर सुरू झाली आहे.

हेही वाचा: Income Tax : कर चोरी करणं आता आणखीनच कठीण! करदात्यांवर 'सॅटेलाइट स्ट्राइक'' , 7000 कोटींची करचोरी आणि सुमारे 900 जणांना आयकर विभागाची नोटीस

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number