Sydney Beach Shooting: सिडनी गोळीबारप्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा! आरोपीचा भारताशी संबंध? पदवीपर्यंतचे शिक्षण भारतात

सिडनीतील गोळीबारप्रकरणी आरोपी साजिद अक्रम आणिनवीद अक्रम यांचा भारताशी संबंध असल्याचे म्हटले जात होते. मात्र यावर आता पोलिस महासंचालक कार्यालयाने मोठा खुलासा केला आहे.

Sydney Beach Shooting: सिडनी गोळीबारप्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा! आरोपीचा भारताशी संबंध? पदवीपर्यंतचे शिक्षण भारतात

ऑस्ट्रेलिया सिडनीतील प्रसिद्ध बाँडी बीचवर घडलेल्या भीषण हल्ल्याच्या तपासात नवनवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. अशातच  या प्रकरणात 15 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेले 50 वर्षीय साजिद अक्रम आणि त्याचा 24 वर्षीय मुलगा नवीद अक्रम यांचा भारताशी संबंध असल्याचे म्हटले जात होते. मात्र यावर आता पोलिस महासंचालक कार्यालयाने मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा- Bondi Beach Attack : सिडनी गोळीबारप्रकरणी धक्कादायक खुलासा; आरोपी बाप-लेकानं केला भारतीय पासपोर्टवर फिलिपिन्सचा दौरा

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध बाँडी बीचवर गोळीबार करणारा हल्लेखोर साजिद अक्रम ही मुळचा हैदराबादचा रहिवासी असल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी मंगळवारी दिली. साजिद मूळचा भारतीय असला, तरी त्याच्यासह मुलगा नवीद अक्रमच्या कट्टरतावादाचा भारत किंवा तेलंगणशी काहीच संबंध नसल्याचे पोलिस महासंचालक कार्यालयाने म्हटले आहे. हैदराबादमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर साजिद नोव्हेंबर 1998 मध्ये रोजगाराच्या शोधात ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाला.

हेही वाचा- Donald Trump: अमेरिकेत जाणाऱ्यांना धक्का! ट्रम्प सरकारचा पाच देशांवर ट्रॅव्हल बॅन, प्रवेश नियम अधिक कडक

ऑस्ट्रेलिया सिडनीतील प्रसिद्ध बाँडी बीचवर हनुक्का उत्सवादरम्यान घडलेल्या भीषण हल्ल्यात 15 नागरिकांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले. या गोळीबारात जखमी झालेल्या 40 जणांमध्ये तीन भारतीय विद्याथ्यांचा समावेश असल्याची माहिती तेथील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. तसेच या गोळीबारात जखमी आणि मृतांमध्ये 10 ते 87 वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश होता. यातील 25 जणांवर अद्यापही उपचार सुरू असून, 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांच्या गोळीबारात साजिद ठार झाला, तर जखमी नवीदवर उपचार सुरू आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number