Iran US War 2026: महायुद्धाचा भडका! इराणचा बहरीन, कतारसह आखाती देशांतील अमेरिकेच्या लष्करी तळांवर प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र हल्ला

इराणने बहरीनमधील अमेरिकेच्या तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला, ज्यामुळे कतारमधील आपला लष्करी तळ अमेरिकेला रिकामा करावा लागला.

Iran US War 2026: महायुद्धाचा भडका! इराणचा बहरीन, कतारसह आखाती देशांतील अमेरिकेच्या लष्करी तळांवर प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र हल्ला

US-Israel’s Iran Strikes: मध्यपूर्वेत युद्धाचा वणवा पेटला असून इराणने बहरीन, संयुक्त अरब अमिराती (UAE), कतार आणि कुवेतसह प्रादेशिक देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर भीषण प्रत्युत्तर म्हणून हल्ले केले आहेत. इराणने बहरीनमधील अमेरिकेच्या तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला, ज्यामुळे कतारमधील आपला लष्करी तळ अमेरिकेला रिकामा करावा लागला. याव्यतिरिक्त, UAE मधील अमेरिकन नौदलाच्या तळालाही लक्ष्य करण्यात आले आहे. इराणने कतार, कुवेत आणि जॉर्डनमधील अमेरिकेच्या तळांवरही मोठे प्रतिहल्ले चढवल्याने संपूर्ण आखाती क्षेत्रात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

“इराणला अणुशक्ती बनू देणार नाही”; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा 
इराणच्या या हल्ल्यांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पहिले अधिकृत विधान समोर आले आहे. ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले की, “आम्ही इराणला कधीही अणुशक्ती बनू देणार नाही. गेल्या 47 वर्षांपासून त्यांनी अमेरिकन नागरिकांसह अनेकांना संपवलं आहे.” ट्रम्प यांनी जाहीर केले की अमेरिकेने ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ (Operation Midnight Hammer) सुरू केले असून, त्यांतर्गत इराणमधील फोर्डो आणि इस्फहान या अणुकेंद्रांवर हल्ले करण्यात आले आहेत. इराणने चर्चेच्या सर्व ऑफर नाकारल्याने त्यांच्यावर हल्ला करणे हाच शेवटचा पर्याय उरला होता, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

अमेरिका-इस्रायलचा संयुक्त हवाई हल्ला आणि ‘F-22’ चा थरार
इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला चढवला आहे. या कारवाईत अमेरिकेच्या प्रगत F-22 रॅप्टर (F-22 Raptor) लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला. इराणची राजधानी तेहरानमधील 30 महत्त्वाच्या ठिकाणांवर एकाच वेळी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या भीषण हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना तातडीने अज्ञात सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, “खामेनींनी आता एकतर आत्मसमर्पण करावे किंवा मृत्यूला सामोरे जावे.”

हेही वाचा – Israel Attacked Iran: पुन्हा युद्ध भडकले! इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, खामेनेईंना हलवले सुरक्षित स्थळी

इराणचा प्रतिहल्ला आणि प्रादेशिक युद्धाचा धोका
अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आता इस्रायलवर 30 हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या युद्धात केवळ इराणच नाही, तर येमेनमधील हुथी बंडखोर आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह देखील इराणच्या बाजूने सक्रियपणे सामील झाले आहेत. यामुळे हे युद्ध आता केवळ दोन देशांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण मध्यपूर्वेत पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. जगभरातील बाजारपेठा आणि कच्च्या तेलाच्या किमतींवरही या युद्धाचे सावट गडद झाले आहे. 

इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे संरक्षणमंत्र्यांचा मृत्यू ? 

दरम्यान, इराणचे संरक्षणमंत्री अमीर नासिरजादेह आणि रिव्होल्यूशनरी गार्ड्स कमांडर मोहम्मद पाकपूर हे इस्रायली हल्ल्यात मारले गेले आहेत. अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर मोठा संयुक्त लष्करी हल्ला केला. दोन्ही देशांचे म्हणणे आहे की हा हल्ला इराणचा अणुकार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास थांबवण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number