Iran US Israel War: इराणचा इस्रायलवर भीषण प्रहार; हैफा ते तेल अवीव हादरले, तब्बल पाच तास सुरू राहिला रॉकेटचा वर्षाव

इराण आणि हिजबुल्लाहने इस्रायलवर क्षेपणास्त्र, रॉकेट आणि ड्रोनद्वारे मोठा संयुक्त हल्ला केल्याचा दावा केला आहे.

Iran US Israel War: इराणचा इस्रायलवर भीषण प्रहार; हैफा ते तेल अवीव हादरले, तब्बल पाच तास सुरू राहिला रॉकेटचा वर्षाव

इराण: पश्चिम आशियातील तणावाने पुन्हा एकदा धोकादायक वळण घेतले असून इराण आणि इस्रायलमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. इराणच्या लष्करी संघटनेने इस्रायलवर मोठ्या प्रमाणात संयुक्त हल्ला केल्याचा दावा केला आहे. या कारवाईत क्षेपणास्त्र, रॉकेट आणि ड्रोनचा वापर करण्यात आला असून अनेक तास चाललेल्या या हल्ल्यामुळे प्रदेशातील परिस्थिती आणखी अस्थिर झाली आहे.

इराणच्या लष्करी दलाशी संबंधित इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (Islamic Revolutionary Guard Corps, IRGC) ने दिलेल्या माहितीनुसार, लेबनानमधील सशस्त्र गट हिजबुल्लाह यांच्या सहकार्याने इस्रायलवर मोठा संयुक्त हल्ला करण्यात आला. सुमारे पाच तास चाललेल्या या कारवाईत क्षेपणास्त्र, रॉकेट आणि ड्रोनचा मारा करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये इस्रायलमधील 50 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

IRGC च्या निवेदनानुसार या मोहिमेत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला, तर हिजबुल्लाहकडून मोठ्या प्रमाणात हल्लेखोर ड्रोन आणि रॉकेट डागण्यात आले. उत्तरेकडील हैफा शहरापासून मध्य इस्रायलमधील तेल अवीव आणि दक्षिणेकडील बेर्शेबापर्यंत अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्यात आल्याचे सांगितले गेले. इस्रायली लष्करानेही या घटनेची पुष्टी करत इराण आणि हिजबुल्लाहने समन्वयाने केलेला क्षेपणास्त्र हल्ला मुख्यतः मध्य इस्रायलला लक्ष्य करून करण्यात आल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: Middle East Conflict: महागाईमुळे पेटवलेली चूलही विझणार! युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसनंतर लाकूडही परवडेनासे; दर ऐकून चिंता वाढेल

दरम्यान, या संघर्षाचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावरही दिसू लागला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हमधून मोठ्या प्रमाणात तेल बाजारात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सुमारे 172 मिलियन बॅरल तेल बाजारात उपलब्ध करून दिले जाणार आहे. अमेरिकेच्या ऊर्जा विभागानुसार पुढील आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरू होईल आणि सुमारे 120 दिवसांत हे तेल बाजारात पोहोचवले जाईल.

अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने सांगितले की भविष्यात साठा पुन्हा वाढवण्यासाठी पुढील वर्षभरात जवळपास 200 मिलियन बॅरल तेल पुन्हा राखीव साठ्यात जमा करण्याची योजना आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेलपुरवठ्याबाबत वाढलेल्या चिंतेमुळे हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

याच दरम्यान फारसच्या आखातात दोन विदेशी तेलवाहू जहाजांवर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. इराकच्या बंदर प्राधिकरणाचे प्रमुख फरहान अल-फार्तूसी यांच्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर लागलेल्या आगीत अडकलेल्या जहाजांमधून 38 कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, मात्र एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. संबंधित जहाजांमध्ये माल्टाच्या ध्वजाखालील ‘झेफिरोस’ आणि मार्शल आयलंड्समध्ये नोंदणीकृत ‘सीफेस विष्णू’ या टँकर्सचा समावेश होता.

या स्फोटामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार स्फोटकांनी भरलेली एक बोट या जहाजांवर आदळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालांनुसार ही बोट इराणशी संबंधित असू शकते, असा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून या घटनेमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता आणखी वाढली आहे.

हेही वाचा: LPG Cylinder Expiry Date: सावधान! मुदत संपलेला गॅस सिलेंडर ठरू शकतो जीवघेणा; 'अशी' तपासा एक्सपायरी डेट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number