‘दिवसा संचारबंदी होऊ नये अशी इच्छा’ – संजय राऊत

राज्यात ओमायक्रॉनसह, कोरोनाच्या रुग्णांत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर दुसरीकडे नागरिक नववर्षाच्या स्वागताची जल्लोषात तयारी करत आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून नववर्षाच्या स्वागतासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ‘दरम्यान दिवसा संचारबंदी होऊ नये अशी इच्छा’ असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. राज्यात रात्रीची संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे आता दिवसा संचारबंदी […]

‘दिवसा संचारबंदी होऊ नये अशी इच्छा’ – संजय राऊत

राज्यात ओमायक्रॉनसह, कोरोनाच्या रुग्णांत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर दुसरीकडे नागरिक नववर्षाच्या स्वागताची जल्लोषात तयारी करत आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून नववर्षाच्या स्वागतासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ‘दरम्यान दिवसा संचारबंदी होऊ नये अशी इच्छा’ असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात रात्रीची संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे आता दिवसा संचारबंदी होऊ नये अशी इच्छा संजय राऊतांनी व्यक्त केली आहे. जर सकाळी संचारबंदी लागली तर आर्थिक चक्र थांबेल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, प्राजक्ता तनपुरे, वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात जाताना सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. असे आवाहन संजय राऊतांनी केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा मास्क लावण्याची विनंती राऊतांनी केली आहे.

भाजपासोबत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ऑफर आली होती. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन करणार हे मविआ नेत्यांना आधीच माहित होते. मात्र आमच्यात पारदर्शकता होती, कारण आम्हाला सत्ता स्थापन करायची होती, असेही संजय राऊत म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number