अमरावती बंदमध्ये सहभागी भाजप नेत्यांची धरपकड

  त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून अमरावती बंदमध्ये सहभागी भाजप नेत्यांना पोलिसांनी अटक केले आहे. माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे, शिवराय कुलकर्णी आणि महापौर यांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व नेत्यांना कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.   […]

अमरावती बंदमध्ये सहभागी भाजप नेत्यांची धरपकड

  त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून अमरावती बंदमध्ये सहभागी भाजप नेत्यांना पोलिसांनी अटक केले आहे. माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे, शिवराय कुलकर्णी आणि महापौर यांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व नेत्यांना कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

  त्रिपुरा हिंसाचार घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावतीमध्ये आंदोलकांनी जाळपोळ करण्यास सुरवात केली असून पोलिसांवरही दगडफेक केली. या अमरावती बंदमध्ये भाजप नेत्यांनीही सहभाग घेतला. त्यामुळे भाजप नेते अनिल बोंडे यांच्यासह १४ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच भाजपच्या अनेक नेत्यांच्या घरांची पोलिसांकडून झाडाझडती सुरू आहे. अमरावतील शहरात बंद आणि हिंसाचारप्रकरणी १५ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच आतापर्यंत ५०हून अधिक आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

अमरावतीमध्ये जमावबंदी लागू

  त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला अमरावतीमध्ये हिंसक वळण लागले. त्यामुळे अमरावतीमधील तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमरावतीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अमरावतीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशसनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमरावतीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आला असून ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. तसेच अमरावतीत इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number