गुजरातमध्ये ६०० कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातल्या जांजुरी गावात एटीएसने केलेल्या धडक कारवाईत १२० किलो हेरॉईन हस्तगत केला आहे. तसेच याप्रकरणी एटीएसने दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
गुजरातचे मंत्री हर्ष सांगवी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये साडेतीनशे कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. तसेच एवढेच नाही तर महिन्याभराआधी तब्बल ९ हजार कोटी रुपयांचे ड्रग्जही गुजरातमध्येच पकडण्यात आलं होते. परिणामी महाराष्ट्रानंतर आता गुजरातमध्ये ड्रग्जचे प्रकरण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
एटीएसने गुजरातमध्ये मोठी कारवाई केली आहे. गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील जांजुरी गावात एटीएसने १२० किलो हेरॉईन जप्त केला आहे. या १२० किलो हेरॉईन अंमली पदार्थाची किंमत ६०० कोटी आहे. एटीएसच्या या कारवाईत एटीएसने दोन आरोपींना अटक केले आहे.