एक अष्टपैलू गायिका, एक उत्कृष्ट परफॉर्मर आणि एक कणखर स्त्री, अशी कितीतरी रुपं आशाताईंमध्ये सामावलीयत….मास्टर दिनानाथ मंगेशकरांकडून मिळालेला संगीताचा वारसा त्यांच्या या कन्येने जोपासला नसता तर नवलच होतं…लता मंगेशकर यांच्यासह आशाताईंनीही सुरांवर हुकूमत गाजवली…शास्त्रीय संगीतावर प्रभूत्व मिळवत, पाश्चिमात्य संगीताची आवाड जोपासत या स्वरआशाने संगीताचं अवकाश दणाणून सोडलं….संगीतकार दत्ता डावजेकर यांनी आशाताईंना गाण्याची पहिली संधी दिली आणि जन्म झाला तो एका ‘स्वरआशा’चा….आशाताईंच्या दैवी सुरांची जादू ही जगभर पसरलीय… त्यांच्या सुरांचा कोलाज प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलीय…येत्या 8 सप्टेंबरला आशाताई वयाची ऐशी वर्षे पार करतायत तेव्हा याच निमित्ताने या ‘स्वररागिणी’चा सुरेल प्रवास पहा फक्त लखलख चंदेरीमध्ये…तसंच या शोचं सूत्रसंचालन प्रसिध्द गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी केलंय……आशाताई या शंकर महादेवन यांच्याही आयडॉल आहेत. त्यामुळे शंकर महादेवन यांनी खास आपल्या स्टाईलमध्ये या शोचं सूत्रसंचालन केलंय…
——————————————————-
Watch Lakh Lakh Chanderi…
Saturday at 1.30 pm &
evening at 5.30 pm
Only on Jai Maharashtra…
Please send us your feedback about the show in the comment box.
You can also find this here:
https://www.facebook.com/lakhlakhchanderi
Host: Shankar Mahadevan