‘मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते तर राष्ट्रनिर्माते होते’ – नसिरुद्दीन शाह

अभिनेता नसिरुद्दीन शाह हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात. आता पुन्हा नसिरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते तर राष्ट्रनिर्माते होते, असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेता नसिरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत केले आहे. तसेच देशातील मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. नसिरुद्दीन शाह म्हणाले, मुस्लिमांमध्ये […]

‘मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते तर राष्ट्रनिर्माते होते’ – नसिरुद्दीन शाह

अभिनेता नसिरुद्दीन शाह हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात. आता पुन्हा नसिरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते तर राष्ट्रनिर्माते होते, असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेता नसिरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत केले आहे. तसेच देशातील मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.

नसिरुद्दीन शाह म्हणाले, मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु देशातील मुस्लिम घाबरणार नाहीत. ते हार मानणार नाहीत. मुस्लिमांना याचा सामना करावा लागेल कारण आपल्याला आपले घर वाचवायचे आहे, मातृभूमी वाचवायची आहे, तसेच आपल्याला आपले कुटुंब आणि मुलांना वाचवायचे आहे. असे ते म्हणाले. तसेच देशात गृहयुद्धासारखे वातावरण निर्माण केले जात असल्याचाही दावा नसिरुद्दीन शाह यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number