बुलडाण्यात ‘टर्मिन’ इंजेक्शनचा गैरवापर; डॉक्टरची पोलिसात तक्रार

अवैधरित्या शरीर यष्ठी वाढविण्यासाठी तसेच नशा करण्यासाठी ‘टर्मिन’ नावाच्या इंजेक्शनचा गैरवापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीचा गैरवापर करत या युवकाने हे टर्मिन इंजेक्श्न मिळवले होते. हे इंजेक्शन खरेदी करताना युवक सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून डॉक्टरांनी या युवकाविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. टर्मिन इंजेक्शन प्रतिबंधित असून काही महत्वाच्या आजारांवर डॉक्टरांच्या […]

बुलडाण्यात ‘टर्मिन’ इंजेक्शनचा गैरवापर; डॉक्टरची पोलिसात तक्रार

अवैधरित्या शरीर यष्ठी वाढविण्यासाठी तसेच नशा करण्यासाठी ‘टर्मिन’ नावाच्या इंजेक्शनचा गैरवापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीचा गैरवापर करत या युवकाने हे टर्मिन इंजेक्श्न मिळवले होते. हे इंजेक्शन खरेदी करताना युवक सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून डॉक्टरांनी या युवकाविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.

टर्मिन इंजेक्शन प्रतिबंधित असून काही महत्वाच्या आजारांवर डॉक्टरांच्या निगराणीमध्येच हे इंजेक्शन दिले जाऊ शकते. असे असतानादेखील बुलडाणा जिल्ह्यातील खामगावामध्ये एका एम.डी. डॉक्टराच्या बनावट लेटरहेडचा वापर करीत प्रतिबंधित असलेले इंजेक्शन मेडिकल वरून विकत घेतले. इंजेक्शन विकत घेताना युवक सीसीटिव्हि कॅमेरात कैद करण्यात आला. तसचे या युवकाविरोधात संबंधित महिला डॉक्टरने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number