‘फडणवीसांच्या सूचना मविआ ऐकणार’

  एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करावे ही एसटी कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एसटी संपाबाबत काही सूचना केल्या असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.   […]

‘फडणवीसांच्या सूचना मविआ ऐकणार’

  एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करावे ही एसटी कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एसटी संपाबाबत काही सूचना केल्या असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.

  अनिल परब यांनी आजही एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याबाबत आवाहन केले. तसेच एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत नेमलेली कमिटीच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विरोधी पक्षनेते हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांन राज्याचा कारभार सांभाळला आहे. फडणवीसांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत काही सूचना केल्या आहेत. त्यामुळे फडणवीसांनी केलेल्या सूचनांचा आम्ही विचार करू असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

  कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीबाबतचा प्रश्न चर्चा करून सोडवण्यात येईल असे परब यांनी सांगितले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकेर निर्णय घेणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. तसेच अनिल परब आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या भेटीमध्ये फडणवीसांनी काही सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता फडणवीसांनी केलेल्या सूचना महाविकास आघाडी विचार करणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number