सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याचा मुद्दा समोर आला आहे. तसेच इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याच्या मागणीला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंद पवार यांनी मोहिम राबविली आहे. तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.
शुक्रवारच्या विशेष समेत ईश्वरपूर नामकरणाचा ठराव होणार असल्याने शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे याकडे लक्ष लागले आहे. मात्र कोणते नाव असावे, याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही. तसेच ईश्वरपूर नामकरण्याचा ठराव नगरपालिकेत झाला तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कोंडीत पकडले जाणार? असा सवालही उपस्थित होत आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील जाहीर सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८६ साली इस्लामपूर शहराचे नाव ‘ईश्वरपुर’ असे जाहीर केले होते. तेंव्हा पासून शिवसेने सहित, विविध संघटनांचा ईश्वरपूर नामकरणासाठी राज्यसरकार कडे पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे आता इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याचा मुद्दा समोर आला असून इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याच्या मागणीला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंद पवार यांनी ही मोहीम राबवली आहे.
शिवसेनेच्या नामांतर मोहिमेला भाजप, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, राष्ट्रीय समाज पक्ष, विश्व हिंदू परिषद, बजरंग दला सहित शहरातील समाज आणि संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.