महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी)च्या  घोटाळ्याप्रकरणी पुणे सायबर सेलने ही कारवाई केली असून या घोटाळ्यात अनेक मोठे अधिकारी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरातून पुणे सायबर पोलिसांना टीईटी परिक्षेची कागदपत्रे […]

महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी)च्या  घोटाळ्याप्रकरणी पुणे सायबर सेलने ही कारवाई केली असून या घोटाळ्यात अनेक मोठे अधिकारी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरातून पुणे सायबर पोलिसांना टीईटी परिक्षेची कागदपत्रे आढळली. त्यानंतर पुणे पोलिसांचा टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू झाला. दरम्यान परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. आणि आज पुणे सायबर सेलने कारवाई करत तुकाराम सुपे यांना अटक  केली आहे.

जानेवारी २०२०मध्ये टीईटीची परीक्षा झाली होती. एजंटच्या मदतीने परीक्षेतील परिक्षार्थींची माहिती मिळवून त्या परीक्षार्थींना पात्र करण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यांच्याकडून प्रत्येकी ५० हजार ते १ लाखांपर्यंत रकमा स्वीकारून साधारण ४ कोटी २० लाख रूपये जमा करुन ते आपापसांत वाटून घेतले आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत पात्र केले यात तुकाराम सुपे यांनी १.७० कोटी, प्रीतिश देशमुख १.२५ कोटी आणि अभिषेक सावरीकर यास १.२५ कोटी रुपये घेतल्याचे चौकशीत कबुल केले आहे.

त्यामुळे टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी पुणे सायबर सेलने परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. तसेच या परीक्षा घोटाळ्यात अनेक मोठे अधिकारी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number